दहिवडी कॉलेजमध्ये ' ट्रॅडिशनल डे ' निमित्त युवकांची धमाल...

विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी केली वेगवेगळे वेशभूषा परिधान...

दहिवडी : दहिवडी कॉलेज दहिवडी  मध्ये 'ट्रेडिशनल डे'  निमित्त युवकांची धमाल पहावयास मिळाली. विद्यार्थी व शिक्षक यांनी वेगवेगळे वेशभूषा परिधान केल्याने कॉलेज पूर्ण कलरफुल दिसत होते. 
लेक्चर,प्रॅक्टिकल्स, सबमिशन, असा रोजचा दिनक्रम असलेल्या दहिवडी कॉलेज मधील आजचा ट्रॅडिशनल डे निमित्त चेहरा वेगळाच दिसून आला.         

      डिझाइनर साड्या, फेटे, कुर्ते, अनारकली पॅटर्न, अशा विविध वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे परिसर कलरफुल्ल झाले होते. निमित्त होते ‘ट्रेडिशनल डे’चे दहिवडी कॉलेज महाविद्यालयात १० फेब्रुवारी रोजी ट्रेडिशनल डे साजरा करण्यात आला. नानाविध पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात, गार्डनमध्ये फोटोसेशन केले. आजचे महाविद्यालयाचे चित्र म्हणजे फोटो सेशनचा कट्टा, असे दिसत  होते.
महाराष्ट्रीयन, बंगाली, साउथ इंडियन, गुजराती, मारवाडी, अशी वेशभूषा केलेल्या युवती, अनारकली पॅटर्न परिधान केलेल्या युवती आणि डिझाइनर घागरा परिधान केलेल्या तरुणींनी महाविद्यालय परिसर रंगीबेरंगी झाला होता, तर मुलींप्रमाणेच मुलांचा देखील जलवा पाहायला मिळाला. फेटे, मोदी जॅकट, पठाणी, शेरवाणी, डिझाइनर धोतर, अशा ड्रेसमध्ये मुलं होते.
 

  

 ट्रॅडिशनल डे ला शिक्षकांचा सुद्धा सहभाग... 

  ' ट्रॅडिशनल डे ' निमित्त शिक्षकांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर सहभाग घेतला. वेगवेगळी वेशभूषा परिधान केली. विद्यार्थ्यांबरोबर कॉलेजमधील शिक्षक सुद्धा सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला