शारजा दुबई या ठिकाणी झालेल्या ज्युनिअर एशिया कप स्टेज थ्री या स्पर्धेमध्ये साताऱ्यातील खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
साताऱ्यातील आदिती स्वामी पार्थ साळुंखे ओजस देवताळे यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत ७ पदकांची केली कमाई
कोमल वाघ-पवार - Wed 28th Dec 2022 04:11 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शारजा दुबई या ठिकाणी झालेल्या ज्युनिअर एशिया कप स्टेज थ्री या स्पर्धेमधील खेळाडूंमध्ये सातारा जिल्ह्यातील दोन खेळाडूंचा सहभाग होता यामध्ये आदिती गोपीचंद स्वामी व पार्थ सुशांत साळुंखे असे खेळाडू सहभागी झालेले होते. यामध्येच नागपूरचा रहिवासी असणारा सध्या सातारा मध्ये सराव करणारा ओजस देवताळे हा देखील खेळाडू भारतीय संघामध्ये कंपाउंड राउंड इव्हेंट मध्ये सहभागी झालेला होता या खेळाडूंना अनुक्रमे आदिती स्वामी हिला सांघिक गटात सुवर्ण व वैयक्तिक रजत पदक प्राप्त झाले त्याच सोबत पार्थ सुशांत साळुंखे याला सांघिक सुवर्ण वैयक्तिक कास्य व मिक्स प्रकारात रजत पदक प्राप्त झाले. त्यात सोबत ओजस देवताळे याला देखील सांघिक सुवर्ण व वैयक्तिक रजत पदक प्राप्त झालेले आहे भारतीय धनुर्विद्या संघाचे हे यश अतिशय उल्लेखनीय आहे भारतीय संघाने सर्वसाधारण चॅम्पियनशिप देखील या स्पर्धेमध्ये मिळवलेले आहे कोरिया सारख्या बलाढ्य संघांना हरवून भारतीय संघाने पदके मिळवलेले आहेत या यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सेक्रेटरी प्रमोदजी चांदुरकर तसेच भारतीय धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष अर्जुन मुंडा सर यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलून विजेत्या खेळाडूंचा सत्कार केला त्याच सोबत साताऱ्यातील यशस्वी खेळाडूंचा सत्कार जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक साहेब तसेच दृष्टी आर्चरी अकॅडमीचे अध्यक्ष असणारे सुजित शेडगे सर त्यात सोबत अकॅडमीतील खेळाडू तसेच दृष्टी पालक वर्ग यांनी विजेत्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन केले तसेच भारतीय संघावर प्रशिक्षक म्हणून काम पाहिलेले प्रवीण सावंत यांचे देखील अभिनंदन सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब तसेच महाराष्ट्र पोलीस क्रीडा विभाग घाटकोपर चे इन्चार्ज एपीआय श्री अभिजीत मोरे यांनी केले.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 28th Dec 2022 04:11 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 28th Dec 2022 04:11 pm













