छ.शाहू महाराज यांनी समाजाला समतेची शिकवण दिली-श्री अनिल पानस्कर
सागर पाटील
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
- बातमी शेयर करा
ढेबेवाडी:महाराष्ट्र शासनाच्या वतीने सामाजिक व विशेष सहाय्य विभाग यांच्याद्वारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. यानिमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ढेबेवाडी मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंतीच्या निमित्ताने बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अनिल पानस्कर म्हणाले "राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वसा व वारसा प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुढे घेऊन चालले पाहिजे. सामान्य लोकांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. शाहू महाराज हे कोल्हापूरचे शाहू व चौथे साहू अशा विविध नावाने प्रसिद्ध होते. शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक होते. शिक्षण,विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध, आरक्षण,समता आणि बंधुता अशा विविध गोष्टीतून त्यांनी कृतिशील कार्य केले.समाजातील अनेक रूढी परंपरा नष्ट केल्या यामुळे राज्य सरकार शाहू महाराजांचा जन्मदिवस 2006 पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करीत आहे. आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा करत त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला होता. त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाला समतेची शिकवण दिली. याप्रसंगी सुशीलकुमार कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी प्राचार्य एम एस.पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्राध्यापक दादाराम साळुंखे यांनी मांनले. या कार्यक्रमास विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमास छत्रपती शाहू महाराज यांच्या आठवणीने विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रबोधनात्मक परिवर्तन झाले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 27th Jun 2023 03:04 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 27th Jun 2023 03:04 pm













