कर्जमाफी वीजबिल माफी अशा नावाखाली शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र- शेतकरी नेते संजय भगत
निसार शिकलगार - Wed 4th Jan 2023 02:51 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : वीज वितरण कंपनी कडे कृषी पंपाचे बिलापोटी अनुदान जमा करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करावे आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या कडून बिलापोटी भरून घ्यावी कर्जमाफी व विज बिल माफी शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र समाज हिताला घातक आहे असे रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदस्य तथा शेतकरी नेते संजय भगत यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या निवेदनात स्पष्ट केली आहे
शेतीपंपांना 24 तास वीज पुरवठा होत नसून केवळ 8 तास कृषी पंपांना वीज दिली जाते तो विज पुरवठाही पूर्ण क्षमतेने व पूर्ण वेळ नसतो तरीही अनुदानापोटी करोडो रुपयांचे लूट वीज वितरण यंत्रणे कडून केली जाते याबाबत शेतकरी संघटनांनी कायदेशीर मार्गाने कोर्टातून न्याय मिळवून घेतला आहे तरीही कोर्टाच्या आदेशाला न जुमानता या चुकीच्या पद्धतीत शेतकरी भरडला जातोय , सरकारी अनुदानाचा ही गैरवापर होत आहे आणि वरून वीज वितरण वाल्यांची उपकाराची भाषा शेतकऱ्यांना ऐकून घ्यावी लागते हे सर्व थांबवण्यासाठी वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपानिमित्ताने सरकारने एक निर्णय घ्यावा आणि कृषी पंपाचे वीज बिला साठी दिले जाणारे अनुदान व उर्वरित बिल हे शेतकऱ्याकडून कृषी पंपाच्या बिलापोटी भरून घ्यावे आम्ही शेतकरी आनंदाने विज बिल वेळेत व वेळेवर भरण्यास तयार आहे असे संजय भगत यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे .कर्जमाफी व विज बिलमाफी नावाखाली शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान थांबवावे स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी शेतकऱ्याच्या नावाचा वापर करून शेतकऱ्याची प्रतिमा मलीन करण्याचे उद्योग आता बंद करा असे प्रसिद्धी पत्रकात संजय भगत यांनी म्हटले आहे
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 4th Jan 2023 02:51 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 4th Jan 2023 02:51 pm













