भुईज येथे महालक्ष्मी शिक्षण संस्थेचे स्नेह संमेलन उत्साहात सपन्न .
बापू वाघ - Fri 20th Jan 2023 02:00 pm
- बातमी शेयर करा
वाई : विद्यार्थी पालक व शिक्षण संस्था यांनी एकत्रितरित्या प्रयत्न केल्यास विद्यार्थ्याची गुणवत्ता विविधता जोपासत वाढवता येते याचे उदाहरण म्हणजे भुईजची महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या वालक मंदीर ते महिला महाविद्यालय आशा सर्वच ज्ञानमंदीरातून गुणवत्ता आणि विदवत्ता दररोज जोपासली जाते यासाठी प्राचार्या व त्यांच्या सहकारी शिक्षकी यांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदनदादा भोसले यांनी केले.
भुईंज येथील महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या बालक मंदीर, प्रियदर्शनी गर्ल्स हायस्कुल व कनिष्ठ महिला महाविद्यालय या संस्थांचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेह संमेलन नुकतेच संपन्न झाले. यावेळी उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार मदनदादा भोसले बोलत होते. व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. सौ. निलीमा भोसले, सचिव सुधाकर भोसले, संस्थेच्या सदस्या डॉ. सुरभी भोसले चव्हाण, सरपंच विजय वेळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मदनदादा भोसले पुढे म्हणाले की वाई तालुक्याच्या पूर्व भागात मुलींसाठी सुरू केलेली ही शिक्षण संस्था ख-या अर्थाने ज्ञानदान करत नवी पिढी गुणवत्ता आणि विदवत्ता जोपासत घडत आहे. येथे शैक्षणिक उपक्रमावरोवरच सर्वांगिण विकासाचे ज्ञान दिले जाते. त्यामुळेच जिल्हयात अग्रमानांकित शिक्षण संस्था म्हणून वेळोवेळी गौरवण्यात आल्या. यासाठी विद्यार्थी पालक व शिक्षण संस्था यांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे गरजेचे आहे असे हि ते म्हणाले.
प्रारंभी इयत्ता दहावीतील कुमारी वैष्णवी संदीप साबळे या विद्यार्थीनीला कै. शांताबाई प्रतापराव भोसले यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार मान्यवरांनी प्रदान केला. पुरस्काराचे वाचन सौ. रेखा वालेकर यांनी केले उपस्थितांचे स्वागत प्राचार्या सौ. संगिता शिंदे यांनी केले. प्रास्ताविक शुभदा महावळेश्वरकर यांनी केले तर सुत्र संचालन सौ. सुरेखा सावंत तर आभार सौ मंगल फरांदे यांनी मानले.
कार्यक्रमास चिंधवलीचे माजी सरपंच जयवंत पवार, भुईजचे माजी सरपंच सौ. अनुराधा भोसले, सौ. पुष्पा भोसले, महिला पतसंस्थेच्या चेअरमन संजीवनी दळवी, डॉ. सौ. वैदेही भोसेकर तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बालक मंदीर ते कनिष्ठ महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी सादर केलेले कार्यक्रम यांना मान्यवरांनी व उपस्थितांनी भरभरून दाद देत कौतुक केले. अंत्यंत देखणं नियोजन व शिस्तबद्ध यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 20th Jan 2023 02:00 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 20th Jan 2023 02:00 pm













