सह्याद्री सह साखर कारखान्यास ब्राझीलच्या पाहुण्यांची भेट
सह्याद्रीचे कामकाज पाहून केले समाधान व्यक्तगौरव खवळे
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
- बातमी शेयर करा
मसूर : यशवंतनगर ता.कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास ब्राझील देशातून आलेल्या जनरल चेन्स डो या कंपनीचे कमर्शियल डायरेक्टर मार्सिओ, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे मुख्य ऊस सल्लागार डॉ. आर. बी. डौले यांनी भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या सहकार्याने दौऱ्याचे आयोजन केले होते. दौऱ्यात पाहुण्यांनी कारखान्यातील कार्यरत यंत्रणेची पाहणी केली. त्यानंतर संचालक मंडळाबरोबर बैठक झाली.
यावेळी पाहुण्यांचा सत्कार संचालकांच्या हस्ते शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन झाला.
स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी केले.
यानंतर ब्राझीलचे मार्सिओ म्हणाले, शेतात ऊस तोडणी होऊन थेट कारखान्यात गाळप केला जातो. ब्राझीलने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानानुसार गाळप करण्यापूर्वी ऊसाबरोबर येणारी माती व पाला स्वच्छ केल्यास प्रतिटन अर्धा टक्का उतारा वाढतो. शिवाय खर्चही जास्त येत नाही. जुन्या तंत्रज्ञानाने माती व पाला रसातून काढण्याची खर्चीक पद्धत आहे. याबाबत त्यांनी सचित्र माहिती दिली. दुभाषिक प्रदीप तावडे यांनी मार्सिओ देत असलेली माहिती मराठीमध्ये संचालक मंडळाला सांगितली.
यावेळी कारखान्याचे संचालक मानसिंगराव जगदाळे, कांतीलाल पाटील, लालासाहेब पाटील, माणिकराव पाटील, अविनाश माने, डी.बी.जाधव, पांडुरंग चव्हाण, पै.संजय थोरात, रामदास पवार, वसंतराव कणसे, सर्जेराव खंडाईत, रामचंद्र पाटील, संजय कुंभार, संचालिका सौ.शारदा पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 18th Aug 2023 05:09 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 18th Aug 2023 05:09 pm













