सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे बेमुदत उपोषण

कऱ्हाड पालिकेचे मुख्याधिकारी, नगर प्रशासन अधिकारी यांच्या चौकशीची मागणी  संबंधितांवर कारवाई न झाल्यास दि.३० रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.

सातारा : कराड नगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विरोधात सबळ पुरावे देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, संबंधितांवर कारवाई न झाल्यास दि.३० रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात संघटनेच्या वतीने इमान मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कन्हाड पालिकेतील मुख्याधिकारी, आरोग्य कर्मचारी, बांधकाम विभाग, लेखा विभागातील कर्मचारी यांच्याविरोधात पुरावे नियमानुसार चौकशीला दिले होते. तरीही तत्कालीन नगर प्रशासनअधिकारी यांनी पुराव्याकडे दुर्लक्ष करून संबंधितांना कायदेशीर कारवाईपासून वाचवले आहे. कऱ्हाड येथील शाळा क्रमांक ३ चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी आणि नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी नितीन जगताप यांच्या कारभाराबाबत वेळोवेळी निदने दिले आहे. परंतु, कन्हाड मालिकेचे न मुख्याधिकारी रमाकांत व तत्कालीन जिल्हा प्रशास यांनी वाचविल्याचे दिसून येत आहे अकाउंट विभागाचे रवी ढोणे यांच्याही कामाची चौकशीचे निवेदन, स्वच्छ सर्वेक्षणात बालकामगारांचा वापर यासाठीचे तक्रार अर्ज, बांधकाम अभिता एम. एच. पाटील यांच्या कारभाराबाबत मुख्याधिकारी व तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी यांना पत्र दिले तरी कारवाई केलेली नाही. त्यामुळे कारवाईस टाळाटाळ केल्याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला