बेकायदेशीर शस्त्र बाळगणारा जेरबंद दोन गावठी पिस्टल व जिवंत राउंड जप्त
1 लाख 80 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यशSatara News Team
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
- बातमी शेयर करा
सातारा :बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱया इसमास पकडून दोन गावठी पिस्टल व एक जिवंत राउंड असा एकूण 1 लाख 80 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी अलतमेश हसन तांबोळी(वय 22, रा. मंगळवार पेठ सातारा) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना गोपनिय माहिती मिळाली की, अलतमेश तांबोळी हा माजगांव फाटा ता. सातारा येथे गावठा पिस्टल विक्री करण्यासाठी घेवून येणार आहे. यानुसार त्या ठिकाणी सापळा लावून कारवाई करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. शनिवार दि. 20 रोजी सायंकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास अलतमेश हा माजगांव फाटा येथे आला. यावेळी त्याला पकडून त्यांची अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या ताब्यात दोन देशी बनावटीची पिस्टल, एक जिवंत काडतुस व एक मोपेड गाडी असा एकून 1 लाख 80 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत पोलीस अंमलदार उत्तमराव दबडे, तानाजी माने, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, संतोष पवार, अतिश घाडगे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, मोहन पवार, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाने, प्रविण पवार, मयुर देशमुख, मोहसीन मोमीण, संकेत निकम, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
संबंधित बातम्या
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
-
शिक्षकाने केला विद्यार्थिनीला अश्लील मेसेज
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
-
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
-
पोक्सो तील आरोपीस २० वर्ष सश्रम कारावास व रु ५००००/- दंडाची शिक्षा.
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
-
उंब्रजमध्ये दिवसाढवळ्या चोरी
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
-
कराड आगाशिवनगर येथे प्रेम संबंधातून खून
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
-
फलटण येथील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; दोन जणांना दोन वर्षांसाठी जिल्हाबंदी
- Sun 21st Aug 2022 02:21 pm
-
हॉटेल व्यवसायिकाला हनीट्रॅप करून ४० लाखांची खंडणी मागणी; पाच जणांना दोन तासांत अटक
- Sun 21st Aug 2022 02:21 pm












