फलटण नगर परिषदेच्या कर घोटाळ्यात फसवणूक झालेल्या नागरिकांनी आपली तक्रार निर्भीडपणे नोंदवावी. नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर

  • फलटण. फलटण नगर परिषदेच्या कर वसुली विभागामध्ये आर्थिक गैर व्यवहार करून नागरिकांच्या कडून रोख रक्कम घेऊन अपरांतपर करण्यात आल्याचे प्रत्यक्ष दर्शनी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे पुढे आले असून. 

अशा प्रकारच्या नागरिकांच्या झालेल्या फसवणुकीबाबत फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर नागरिकांना न्याय देण्यासाठी आक्रमक झाले असून नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन आपल्या तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे. 

(फलटण शहर या कर घोटाळ्याने हादरले.)

शनिवार दिनांक 11 जुलै 2026 रोजी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी या कर घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याने फलटण शहरातील नागरिकांच्या एकच खळबळ उडाली असून ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष समशेरशीय नाईक निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून मोठ्या संख्येने नागरिक आपली तक्रार नोंदवण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. 



नगराध्यक्षांनी या कर घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याने शहरातील बहुसंख्य जाणकार नागरिकांनी मात्र नगराध्यक्ष समशेरशीय नाईक निंबाळकर यांचे आभार व्यक्त केले आहेत. याबाबत नागरिकांनी फलटण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री निखिल जाधव यांनी पण आपली भूमिका स्पष्ट करावी अशी आग्रही मागणी होत आहे. आणि तत्कालीन अधिकारी कर्मचारी सुद्धा या कर घोटाळ्यात दोषी असतील तर प्रशासनाच्या नियमानुसार नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात यावा अशी ठोस भूमिका ही आता नागरिक घेताना दिसून येत आहेत.

(तक्रारदारांची नावे  गोपनीय ठेवण्यात येणार)

याबाबत फलटण शहरातील नागरिकांना नगराध्यक्ष यांनी आवाहन केले आहे की याबाबत ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यांनी निर्भया आणि निपक्षपणे आवश्यक कागदपत्रांसह फलटण नगरपरिषद येथे संपर्क साधावा. 

(या घोटाळ्याची व्याप्ती व्यापक) 

या कर घोटाळ्याची व्याप्ती व्यापक असण्याची दाट शक्यता असून यामध्ये फक्त कर्मचारीच नसून काही अधिकारी तसेच तत्कालीन अधिकारी आणि पदाधिकारी यांचाही सहभाग असण्याची दाट शक्यता असून त्यांच्या सहभागाबाबत ही कसून चौकशी निपक्षपणे करण्यात येणार आहे. 

(दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर होणार कठोर कारवाई)

नगराध्यक्ष समशेर सिंह नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आता आक्रमक झाले असून या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांची कोणतीही गयी केली जाणार नसून तसेच त्यांना कोणत्याही प्रकारची दया न दाखवता प्रशासकीय नियम आणि कायद्यानुसार कारवाई करून नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार  आहेत.

(नगरपरिषद प्रशासनाचे आवाहन).

नगराध्यक्ष समशेर सिंह आणि नगरपरिषद प्रशासनाने आवाहन केले आहे की नागरिकांनी आपण भरलेल्या कराच्या पावत्यानुसार आपला कर अधिकृतरित्या भरणा झालेला आहे का त्याची नोंद घेतलेली आहे का याची खातरजमा करून नगर परिषदेतील अधिकृत नोंदीत काही शंका निर्माण झाल्यास तसेच काही तफावत आढळल्यास निर्भीडपणे प्रशासनाकडे आपली तक्रार दाखल करण्यात यावी. नागरिकांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपल्या तक्रारी नोंदवाव्यात म्हणजे लोकप्रतिनिधी या नात्याने नागरिकांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून न्याय दिला जाईल. 

(फलटण नगर परिषदेचा विविध विभागाबाबत ही आता दीपक्षपणे चौकशी होऊन नगरपरिषदेतील कर्मचारी अधिकारी दोषी आढळल्यास निपक्षपणे चौकशी करून त्यांच्यावरही तात्काळ कठोर कारवाई नगर परिषदेच्या नियमानुसार आणि कायद्याने करण्यात येणार असून नागरिकांनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला