'टेंडर किंग'ने प्रस्ताव मंजुरी प्रक्रियेचे ज्ञान घ्यावे अविनाश कदम; सूर्यावर थुंकाल तर स्वतःचेच तोंड भरवून घ्याल

सातारा :  सातारा शहरात विविध भागात पाहणी करून नागरिकांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले विविध विकासकामे मार्गी लावतात. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या मागणीनुसार ७ कोटी २० लाखाची कामे आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेवरूनच मंजूर झाली आहेत. हे पचनी न पडल्यानेच सातारा पालिकेतील 'टेंडर किंग'ने गरळ ओकून सूर्यावर थुंकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आणि स्वतःचेच तोंड भरवून घेतले. या 'टेंडर किंग'ने विकासकामांचे प्रस्ताव कसे मंजूर होतात याचे ज्ञान आधी घ्यावे, असा टोला माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी लगावला आहे. 

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कदम यांनी म्हटले आहे की, आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत शहरातील विविध विकासकामे मंजूर होणेसाठी दि. १० मे २०२३ रोजी जिल्हा नियोजन समितीला लेखी पत्र दिले होते. त्यानुसार सदरची कामे मंजूर होऊन निधी उपलब्ध झाला आहे. कोण विकासकामे मार्गी लावतंय आणि कोण नुसतंच थापा मारतंय, हे सर्व सातारकरांना चांगले कळून चुकले आहे आणि त्यामुळेच आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांच्या पोटात दुखू लागलं आहे. 'माझं ते माझं आणि तुझं ते बी माझंच' अशी वृत्ती असणाऱ्यांनी नागरिकांची दिशाभूल व्हावी यासाठीच वृत्तपत्रातून बातमी देण्याचा कुटील डाव खेळाला पण, सातारकरांना डोळे मिटून दूध पिणारे मांजर कोण? हे चांगलेच उमगले आहे. त्यामुळे चोरांनी उलट्या बोंबा मारण्याने काहीही फरक पडणार नाही.

टेंडरसाठी पालिकेत कळवंडी करणाऱ्यांनी विकासकामे कशी मंजूर  केली जातात, त्यासाठी प्रस्ताव देऊन हे प्रस्ताव शासकीय प्रक्रियेने मंजूर कसे होतात याचे ज्ञान घेतले पाहिजे. केवळ टेंडरसाठी भांडणाऱ्यांनी प्रस्तव मंजुरीची प्रक्रिया काय आहे, याचा अभ्यास करून मग एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलणे अपेक्षित आहे. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्याबद्दल बोलताना आपली पात्रता काय? आपण बोलतोय काय? याचे भान ठेवले पाहिजे. शेवटी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कराल तर स्वतःचेच तोंड भरवून घ्याल, याचेही भान 'टेंडर किंग' ने ठेवले पाहिजे, असा टोला कदम यांनी लगावला आहे. दरम्यान, पुराव्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले लेखी पत्र प्रसिद्धीसाठी देत असून झोपेचे सोंग घेणाऱ्या विरोधकांचे यानिमित्ताने का होईना डोळे उघडतील हीच अपेक्षा, अशी उपरोधात्मक टीकाही कदम यांनी केली आहे.   

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला