कोयत्याने वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने बारा तासाच्या आत केले जेरबंद

सातारा  : काल रात्री 8:30 च्या सुमारास क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा येथील भाऊ जाधव यांच्या घरातील हॉलमध्ये भाऊ जाधव यांच्या मालकीच्या जागेमध्ये टाकलेली पान टपरी काढायला लावली म्हणून दोन इसमानी त्यांच्याकडे माफी मागण्याच्या बहाण्याने येऊन त्यांच्या कपाळावर डोक्यात तसेच डाव्या हाताच्या तळव्यावर व त्यांची पत्नी यांच्या उजव्या हाताच्या पंजावर ,तसेच भाऊ जाधव यांचा मित्र याच्या डाव्या कोपऱ्यावर उजव्या हाताच्या बोटावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याचा फिर्यादीवरुन सातारा शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ४६२ / २०२३ भादविक ३०७, ३४ अन्वये गुन्हा नोंदगुन्हा दाखल झाला होता

गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख पोलीस उपअधीक्षक बापू बांगर यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोहरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा मसूर फाटा येथे शेतात असल्याची गोपनीय माहिती मिळताच मुख्य आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या पथकाने मुख्य आरोपीचा मसूर फाटा येथील शेतात रात्री शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे या गुन्ह्यातील आरोपी 12 तासाच्या चोरबंद केल्याने पोलीस अधीक्षक समीर शेख ,पोलीस उपाधीक्षक बापू बांगर यांनी अभिनंदन केले आहे

या कामी श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, राकेश खांडके, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, मोहन पवार, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, रोहित निकम, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, अमृत कर्पे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.

आरोपीचे नाव
हर्षद संभाजी साळुंखे वय २१ वर्षे रा क्षेत्रमाहुली ता जि सातारा

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला