कराड तासवडे (ता. कराड) येथे टोलनाक्यावर गोवंश वाहतूक करणारा आयशर टेम्पो गोरक्षकांनी तळबीड पोलिसांच्या मदतीने पकडला
Satara News Team
- Tue 30th May 2023 11:57 am
- बातमी शेयर करा
तासवडे : कराड तासवडे (ता. कराड) येथे टोलनाक्यावर गोवंश वाहतूक करणारा आयशर टेम्पो गोरक्षकांनी तळबीड पोलिसांच्या मदतीने पकडला. पकडलेल्या आयशर टेम्पो मध्ये गाई, बैल, लहान वासरे अशी एकूण 12 गोवंशीय जनावरे दाटीवाटीने भरण्यात आली होती. माणद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी या कारवाई विषयी माहिती दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, परळी खोऱ्यातून एका एजंटामार्फत जनावरांची विक्री केली जात होती. ही जनावरे पेडगाव इस्मालपूर येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी घेवून जात असल्याची माहिती गोरक्षकांना बातमी दारांमार्फत मिळाली. त्यानंतर गोरक्षकांनी तासवडे येथे धाव घेऊन तळबीड पोलिसांचे सहकार्य घेतले. आज मंगळवारी सकाळी एक आयशर टेम्पो मिळून आला. टेम्पोची तपासणी केली असता गाई, बैल, लहान वासरे अशी एकूण 12 गो-वंशीय जनावरे दाटीवाटीने भरण्यात आल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी सदरचा टेम्पो, 12 जणावरे व टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई संग्राम माळी, वैभव जाधव, समाधान करपे, प्रकाश माळी, आदित्य माळी, महेश जाधव, तुषार निकम, रोहित साळुंखे, अतुल निकम तसेच तळबीड पोलीस ठाण्याचे शहाजी पाटील, ओंबासे यांनी केली
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 30th May 2023 11:57 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 30th May 2023 11:57 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 30th May 2023 11:57 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 30th May 2023 11:57 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 30th May 2023 11:57 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Tue 30th May 2023 11:57 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th May 2023 11:57 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 30th May 2023 11:57 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 30th May 2023 11:57 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 30th May 2023 11:57 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 30th May 2023 11:57 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 30th May 2023 11:57 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 30th May 2023 11:57 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 30th May 2023 11:57 am













