नवीन शैक्षणिक धोरणातून शाश्वत विकास शक्य -प्रा.दिपक गुरव

देशमुखनगर: भारताच्या शैक्षणिक धोरणात ३४ वर्षानंतर अमुलाग्र बदल झालेले आहेत. या धोरणामुळे अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कर्तव्य संविधानिक मूल्य  रुजविण्यास मदत होणार आहे. तसेच सन -२०२० मध्ये शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेले हे नवीन शैक्षणिक धोरण युवकांसाठी जागतिकीकरणामध्ये उपयुक्त ठरणार असून देशाचा शाश्वत विकास शक्य होणार आहे असे उद्गार प्रा.दिपक गुरव यांनी काढले .
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेज, नागठाणे महाविद्यालयात २५ जुलै, ते २९ जुलै हा सप्ताह 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह' म्हणून विविध उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहांतर्गत प्राध्यापक प्रबोधिनी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटनपर व्याख्यानप्रसंगी  "New Education  Policy 2020 , ABC & MEME Structure and Regulation" या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे हे होते.
       प्रा.दिपक गुरव आपल्या भाषणात पुढे म्हणाले , सर्वांनी बदलते नवीन शैक्षणिक धोरण समजून घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी श्रेयांक पद्धती, परीक्षा पद्धती, अंतर्गत मूल्यमापन पद्धती, ग्रेड, एबीसी आणि डिजिटल लॉकर यासंबंधी विस्तृत मार्गदर्शन केले. बदलत्या शैक्षणिक धोरणाचा स्वीकार करून सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक आहे असेही त्यांनी आपले विचार व्यक्त केले .
     या व्याख्यानपर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ सतीश घाटगे आपल्या भाषणात म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणातून सर्जनशील विचार, चिकित्सक विचार, संशोधन वृत्ती, उपयुक्त कौशल्य, आत्मविश्वास  इत्यादी कौशल्यांची वाढ युवकांमध्ये होणार आहे. मात्र नवीन शैक्षणिक धोरणाचे क्रांतिकारी पाऊल निश्चितच आश्वासक आहे .
 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.राजाराम कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.राहुल गंगावणे यांनी तर आभार प्रा. रणधीर शिलेवंत यांनी मांडले. याप्रसंगी सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला