बकासुर गॅंग मधील तीन फरार जेरबंद
शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
कोमल वाघ-पवार - Thu 22nd Jun 2023 11:58 am
- बातमी शेयर करा
सातारा : शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने बकासुर गॅंग मधील तीन फरारी आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ जून रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भैरोबाचा पायथा येथे बकासुर गॅंग मधील अण्णा माने, आदित्य गोसावी, प्रेम पवार, अर्जुन साळुंखे, विशाल सावंत या व इतर दोन ते तीन मुलांनी एकाला त्यांच्याविरुद्ध साक्ष दिली म्हणून तसेच यापूर्वीच्या केस मध्ये झालेल्या खर्चासाठी खंडणीची मागणी करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकून त्यांच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच त्यांच्या गाडीवर कोयते मारून दहशत पसरवली. याबाबतचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाण्यात बकासुर गॅंगच्या विरोधात दाखल झाला होता.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. तसेच पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व गुन्हे शाखेचे अंमलदार यांना या आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बकासुर गॅंग मधील अण्णा माने, अर्जुन साळुंखे, विशाल सावंत हे फरारी झाले होते. या आरोपींच्या शोधकामी शाहूपुरी शाखेच्या विविध पथकांनी त्यांचा पुणे, सारखळ, कास परिसरात शोध घेतला होता. परंतु हे आरोपी त्यांचे वास्तव्य बदलून राहत असल्यामुळे सापडत नव्हते.दि. 19 जून रोजी गुन्हे शाखेच्या अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की, बकासुर गॅंग मधील फरार आरोपी अण्णा माने राहणार दिव्य नगरी, सातारा हा त्याच्या राहत्या घरी घरच्यांना भेटण्यासाठी येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पहाटेपासूनच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अण्णा माने यांच्या घराच्या परिसरात सापळा लावून दबा धरून बसले. यानंतर दुपारच्या सुमारास अण्णा माने हा त्याच्या घराच्या परिसरात येताच त्याला गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी त्याच्या घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे त्याच्या फरारी साथीदारांबाबत विचारपूस केली असता तो प्रथम उडवा-उडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर त्याच्याकडे गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी त्याच्या फरारी इतर साथीदारांबाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे दोन्ही साथीदार हे सारखळ डोंगरामध्ये लपून बसल्याची माहिती दिली. माहिती मिळाल्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या अंमलदारांनी सारखळमधील डोंगरांमध्ये शोध मोहीम राबवून इतर फरार आरोपी विशाल सावंत आणि अर्जुन साळुंखे यांचा शोध घेऊन पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. यानंतर सर्व आरोपींना दरोड्याच्या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, सातारचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरेश घोडके, विजय कांबळे, पोलीस नाईक निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्नील पवार, सुमित मोरे यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 22nd Jun 2023 11:58 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 22nd Jun 2023 11:58 am













