माझ्या बहिणीची जट काढली. आता माझी पण जट काढा !

सातारा : माझीही जट सोडवा.... अशी आर्त हाक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय चव्हाण यांनी ऐकली.नि, त्यांनी जटा निर्मूलन केले.
       गोंदवले,बु।। ता.माण येथील आशा भोंडवे (वय-५५) या अशक्तपणा व त्वचा विकार यासाठी  येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत आहेत.त्यांना गेल्या ३० वर्षापासून जट आहे.ती देवीची जट आहे. म्हणून परडी घेतली. पण, ती जट पुढे वाढतच गेली.त्याचा डोक्‍यावर भार होऊन मान दुखीचा त्रास वाढत राहिला.शिवाय, त्वचेचे विकार होऊ लागले. दवाखान्यात  डॉक्टरांनी सांगितले की, जट काढली तर आजार बरा व्हायला मदत होईल. मुलगा अजित व अमोल, मुलगी जयश्री यांनी निर्णय घेतला की, आपण जट काढूनच आईला घरी न्यायचे. त्यांनी अंधश्रद्धा समितीचे उदय चव्हाण यांच्याशी संपर्क साधल्याने आशा भोंडवे यांची तीस वर्षाची जट चार फूट लांबीची साधारण पाच किलो वजनाची होती.ती जट काढल्यावर त्या म्हणाल्या,आता मला हलकं वाटतंय. आशा भोंडवे यांना दवाखान्यात भेटण्यासाठी आलेल्या त्यांच्या मोठ्या भगिनी माया यादव (राहणार वरकुटे- मलवडी,ता.माण) यांनी हा सर्व प्रकार पाहत होत्या. जट का येते ? त्या बद्दलची भीती कशी पसरवली जाते ? याबद्दल कार्यकर्ते सांगत असताना त्या ऐकत होत्या.डोक्यावरचा पदर बाजूला काढत त्या म्हणाल्या,  माझी पण एक वर्ष झाली जट आहे. ती काढाल का? त्यावर कार्यकर्त्यांना लगेच होकार दिला. एकाच दिवशी दोन्ही बहिणी जटांमधून मुक्त केल्याचा आनंद कार्यकर्त्यांना झाला. अंनिसच्या वंदना माने व डॉ. दीपक माने यांच्या मदतीने जटा निर्मूलन झाले. या प्रसंगी आशा भोंडवे यांचे नातेवाईक,सिव्हील हॉस्पिटल मधील डॉक्टर व नर्स यांचे सहकार्य मिळाले.अजूनही गावागावात मनात देवाच्या भीतीपोटी जट असणाऱ्या व्यक्तींची आपले जीवन असह्य होऊन जगत असतात. त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा.असेही आवाहन करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला