लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या वडूज मधील दाम्पत्य वडूज पोलिसांच्या ताब्यात
Satara News Team
- Wed 4th Sep 2024 10:50 am
- बातमी शेयर करा
वडूज : लाडकी बहीण या योजनेमध्ये गैरकारभार झाल्याची तक्रार पनवेलमधील भाजपचे माजी नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी २ सप्टेंबर रोजी पनवेल तहसीलदारांकडे केली होती. खारघरमधील एका महिलेचे आधार कार्ड वापरून साताऱ्यात ३० अर्ज भरले असून, यातील काही खात्यांमध्ये पैसेही जमा झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जिल्हा प्रशासनाने तातडीने समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावला.
निमसोड येथील बारावी शिक्षण घेतलेला गणेश घाडगे हा भिवंडी येथे सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याची पत्नी प्रतीक्षा घाडगे हिने माहेरचे नाव प्रतीक्षा पोपट जाधव या आधार कार्डचा वापर केला. तसेच तिच्या मोबाइल नंबरवरून बहीण कोमल संजय पिसाळ, मावशी सुनंदा संजय पिसाळ (रा. चितळी, ता. खटाव), मंगल संजय घाडगे (रा. निमसोड), पूजा बाळासाे जाधव (रा. गुरसाळे) यांची आधार कार्डे घेऊन, गुगलला आधारच्या वेबसाईटवर सर्च करून पंचवीस आधार नंबर सर्च केले. हे आधार नंबर तिने अर्जामध्ये भरले. त्यानंतर प्रतीक्षा जाधव हिने विविध पेहरावांत सेल्फी घेऊन अधिकचा लाभ मिळविण्यासाठी वेबसाइटवर फोटो अपलोड केले. या अपलोड केलेल्या अर्जाला वडूजमधील माणदेशी महिला सहकारी बॅंकेचे खाते लिंक केले. अपलोड केलेल्या तीस अर्जांपैकी प्रतीक्षाच्या नावे २९ ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये जमा झाले. या घटनेची बालविकास प्रकल्प अधिकारी एस. एस. खाबडे यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पाेलिस निरीक्षक घनशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत पाटील हे अधिक तपास करीत आहेत.
पोलिसांनी निमसोड, ता. खटाव येथील गणेश संजय घाडगे (वय ३०) व त्याची पत्नी प्रतीक्षा (२२) या दाम्पत्याला रात्री ताब्यात घेतले.
‘त्यांनी’ नातेवाइकांनाही गोवले...
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी नातेवाइकांच्या आधार कार्डचा वापर केला. त्यामुळे नातेवाइकांनाही त्यांनी यात नाहक गोवले. अशा प्रकारे आणखी कुठे त्यांनी फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 4th Sep 2024 10:50 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 4th Sep 2024 10:50 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 4th Sep 2024 10:50 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 4th Sep 2024 10:50 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 4th Sep 2024 10:50 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 4th Sep 2024 10:50 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Wed 4th Sep 2024 10:50 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 4th Sep 2024 10:50 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Wed 4th Sep 2024 10:50 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 4th Sep 2024 10:50 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Wed 4th Sep 2024 10:50 am











