मोलमजुरी करणाऱ्या महिलेची मुलगी झाली महाराष्ट्र पोलीस

काजल आणि सुजित यांना पोलीस भरतीत यश

  सातारा:  छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या मामुर्डी  नगरीचे श्री केदारेश्वर विकास मंडळाचे अध्यक्ष राजेद्र ज्ञानदेव धनावडे यांचे सुपुत्र चि सुजित तसेच तानाजी भैरू धनावडे यांची नात व दुसऱ्याचे शेतामध्ये शेतमजुरी करणारी सौ दिपाली चंद्रकांत धनावडे यांची सुकन्या कु  काजल ही मामुर्डी गावची प्रथम महिला पोलीस  झाली.
      ….चिरंजीव सुजित याचे वडील राजेंद्र धनावडे यांनी आजपर्यंत श्री केदारेश्वर विकास मंडळामार्फत गावची निस्वार्थपणे सेवा केली आहे त्याचंच हे फलित आहे तसेच स्वाध्याय परिवाराचे काम संपूर्ण महाराष्ट्रात करीत असल्याने त्यांना पांडुरंग शास्त्री आठवले यांचाही आशीर्वाद लाभला राजेंद्र धनावडे व त्यांच्या पत्नी कांचन वहिणी यांनी सुजितला दिलेले संस्कार यामुळेच आज सुजित पोलीस भरती झाला अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. मागील दोन वर्ष सुजीत एम पि एस सी चा अभ्यास करीत आहे एमपीएससी चा अभ्यास करता करता सुजित  महाराष्ट्र पोलीस झाला सुजित हा खो खो  चा खेळाडू आहे. सुजित आणि काजल पोलीस मध्ये भरती झालेबद्दल संपूर्ण गावात आनंद साजरा होत आहे
         काजल ही एक गरीब कुटुंबातील मुलगी आहे तिच्या कुटुंबाला रहायला चांगले घर सुद्दा नाही तिने सन २०१९ साली सौ व श्री कदम सरांचे जावली करीअर अकॅडमी मध्ये फक्त आणि फक्त खाकी साठी भरती झाली काजल ची जिद्द , चिकाटी पाहुन जावली करीअरचे कदम सर यांनी तिला दत्तक घेतले आणि कदम सरांचा विश्वास तिने सार्थ केला यापूर्वी सुद्दा मामुर्डी चा महेश धनावडे ज्याचे वडील  अचानक गेले मुळे त्याला ही कदम सरानी दत्तक घेतले होते पुढे तो ही आर्मी मध्ये भरती झाला  ज्या मुलांना आई – वडील नाहीत किंवा ते गरीब आहेत अशा मुलांना जावली करीअर अकॅडमी दरवर्षी दत्तक घेते काजल अभ्यासामध्ये फार हुशार आणि जिद्दी असल्यामुळे तिला सर्वजण काजु म्हणतात. मुलींनी जिद्द दाखवली ना तर खरोखरच मुली यशाचे शिखर मिळवणारच. मामुर्डी चे माजी सरपंच सुनिल धनावडे म्हणाले काजलच्या आई-वडिलांची गरीब परिस्थिती त्यामुळे आई दिपाली रोज मोल मजुरी करायची तेव्हा त्यांचे घराची चुल पेटायची . काजलचे घर इतके साधे आहे कि कधी बाजुची भिंत किवा छप्पर खाली येईल सांगता येत नाही अशा परिस्थीतीत सुद्दा आपल्या  दोन मुलीं व  सासु सासर्यां सोबत राहत आहे अशा परिस्थीतीत मुलींनी जिद्द सोडली नाही परिस्थितीशी दोन हात केले मुलींची जर जिद्द असेल तर आई-वडिलांचे आशीर्वाद ,थोर मोठ्यांचे आशीर्वाद कधीच कमी पडणार नाही याचे साक्षात उदाहरण म्हणजे कुमारी काजल.काजल ला भाऊ  नसल्यामुळे आई दिपाली ही काजल आणि सानिका यांना आपला मुलगाच मानते मागील वर्षी पावसाळ्यात अपघात होवून सानिका हिचे अंगावर झाड पडले तेव्हा मात्र काजलचे सर्व कुटुंब हादरले होते परंतु त्यावेळी गावातील तरुणांनी सर्व ग्रामस्थांनी आपापले कुवती प्रमाणे आर्थिक मदत केली त्यामुळे काजल चे कुटुंब व तिची बहीण आज उभी आहे. काजलला कोणतेही प्रोटीनयुक्त खाद्य नसताना मिळेल ती भाकर खाऊन , मिळेल ते अन्न खाऊन तिने आज हे यश प्राप्त केले आहे गावातील तरुणाचे तसेच ग्रामस्थांचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे कारण अकॅडमीतुन सुटलेनंतर तिला रात्र व्हायची तेव्हा कोणताही मामुर्डीकर गाडीवाला काजलला पाहीले नंतर गाडी थांबवुन तिला मामुर्डीत तिचे घरी सुखरूप पोहोचवायचा.     सातारा न्युज ने काजल आणि सुजित ने अजून  पुढे चांगले प्रयत्न करून उच्च पदावर त्यांची निवड व्हावी आणि दोघांना ही चांगले आरोग्य धनसंपदा ऐश्वर्या आणि त्यांचे बुद्धिमत्तेमध्ये वाढ होवो . हीच परमात्मा पांडुरंग चरणी प्रार्थना सर्व मामुर्डीकर करीत आहेत . काजल व सुजित चे यशाबद्दल आमदार शिवेंद्रराजे भोसले सातारा जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे सरपंच जगन्नाथ धनावडे सरपंच परिषद जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे हणमंत शिंगटे वेण्णामाई पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पार्टे व्हा चेअरमन पांडुरंग धनावडे संचालक सुनिल धनावडे आशा धनावडे ग्रामपंचायत सदस्य बाजीराव धनावडे सविता धनावडे सुषमा धनावडे लक्ष्मी जाधव वसंत मोरे रंजना धनावडे सोसायटीचे व्हा चेअरमन पांडुरंग धनावडे संचालक आनंदराव धनावडे सोपान धनावडे जगाबाई भिलारे यांनी अभिनंदन केले.        जावली तालुक्यातील प्रतिकूल परिस्थिती आपल्याला शिकवते की सातत्यपूर्ण न थकता आभ्यासावर मेहनत घेऊन यशाची वाट पाहण्याचा संयम राखणे  म्हणजे यश होय .ज्या मुलांना आई वडील नाहीत किंवा जे गरीब आहेत अशा मुलांना ॲकॅडमीने दत्तक घेते. ऋतुजा शेलार ऋतुजा मर्ढेकर संजना जाधव काजल धनावडे प्रतीक्षा मोरे प्रियांका जाधव सूरज जाधव निखिल कांबळे पूनम शेलार योगेश कदम किशोर ढोकळे हे जावली करियर ॲकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी आहेत

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला