नटराज मंदिर परिसरात गोळ्या झाडत खून केलेल्या बारक्यां’च्या शिक्षेसाठी सातारा पोलिसांची फिल्डींग
प्रकाश शिंदे - Sat 15th Oct 2022 10:40 am
- बातमी शेयर करा
सातारा : चार महिन्यांपूर्वी सातार्यातील नटराज मंदिर परिसरात अल्पवयीन मुलांनी जवळून पिस्तुलींमधून गोळ्या झाडत खून केलेल्या घटनेला चार महिने झाले आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी सज्ञान दोघांविरुध्द नियमित न्यायालयात तर अल्पवयीन मुलांनाही शिक्षा लागावी यासाठी चार्जशीट तयार करुन त्याचा प्रस्ताव पाठवला आहे.
अल्पवयीन बारक्यांनाही शिक्षा लागावी यासाठी पोलिसांनी फिल्डींग लावल्याची जिल्ह्यातील पहिलीच केस असून बाल न्यायालयाकडे आता लक्ष लागले आहे. अभिजीत उर्फ भैय्या मोरे, सोमनाथ उर्फ सोन्या शिंदे (दोघे रा.रविवार पेठ, वाई) अशी सज्ञान आरोपींची नावे असून सध्या ते कारागृहात आहेत. तसेच यामधील प्रत्यक्ष ज्यांनी फायरिंग केले ती अल्पवयीन मुले बालसुधार गृहात आहेत. यातील एकाची रवानगी पुणे बाल सुधारगृहात तर दोघांना जामीनावर सोडण्यात आले
दि. 2 जुलै रोजी भुईंज, वाईमधील युवकांच्या गँगवॉरमधून संशयित पाच जणांनी कट रचून अर्जुन राणा याचा सातार्यात खून केला. एलसीबी पथकाने गँगवॉरमधूनच खून झाल्याचे सांगितल्यानंतर राणा सातार्यात कसा आला? याचा तपास केला असता त्यासाठी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामचा वापर झाल्याचे समोर आले. संशयितांनी युवतीचे बनावट अकाऊंट काढून राणा याला भेटायला सातार्यात बोलवले. त्याने मुलगी समजून सातार्यात येण्याचे मान्य केल्यानंतर अल्पवयीन मुलांनी त्यांच्या बंदूकीतून गोळ्या झाडत राणाचा मर्डर केला.
दरम्यान, नटराज मंदिर खून प्रकरणात तीन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची सातार्यातील बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली. काही दिवसांनी त्यांचा जामीन झाला. यातील दोघांना कॉलेज प्रवेश प्रक्रिया पार पाडायची होती. तिसरा संशयित मात्र वाई परिसरात धारदार हत्यार घेवून सापडल्याने त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले. त्याची वर्तणूक पाहून सातार्यातून त्याची पुढे पुणे सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
जेजे कोर्ट..15..18 अन्वये सुनावणी
कोणत्याही गुन्ह्यात संशयित आरोपीचे वय 16 वर्षांपेक्षा अधिक असेल तर शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. यासाठी पोलिस अल्पवयीन मुलांचे चार्जशीट तयार करुन जेन्युआईल जस्टीस (जेजे) कोर्ट हे बालसुधार गृहात नियुक्त असते त्यांच्याकडे पाठवतात. बालसुधार गृहात जेजे अॅक्ट 15 अन्वये 5 जणांची कमिटी असते. ही कमिटी आलेली सर्व कागदपत्रे, चार्जशीट पडताळते. संशयित अल्पवयीन मुलाच्या गुन्ह्यात क्रूरता असेल त्या खटल्याची जेजे अॅक्ट 18 अन्वये सुनावणी होते. दरम्यान, अल्पवयीन मुलांच्या खटल्यामध्ये पोलिसांना परवानगी मिळाल्यानंतर बालसुधार गृहातच साध्या वेशात हा खटला चालवला जातो व चार ते पाच सुनावणीमध्ये त्याचा निकाल सुनावला जातो.घाडगे-देशमुख जोडीची आयडिया
शहर पोलिस ठाण्यातील दप्तरी पोलिस राहूल घाडगे व श्रीनिवास देशमुख यांनी नटराज मंदिर खून प्रकरणातील कागदांची जंत्री बनवली आहे. ही जोडी पोलिस दलातील किचकट, गुंतागुंत गुन्ह्यातील कागदं बनवणारी यंग पण अनुभवी जोडी म्हणून ओळखली जात आहे. कायद्याचा अभ्यास करुन त्यांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलांचे चार्जशीट तयार करुन मंजुरी मिळवण्यासाठी पाठवण्याचा मानस पोनि भगवान निंबाळकर यांच्याकडे बोलून दाखवला. त्यानुसार पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याला परवानगी देवून प्रस्ताव बाल न्याय मंडळात पाठवण्यास सांगितले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 15th Oct 2022 10:40 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 15th Oct 2022 10:40 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 15th Oct 2022 10:40 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 15th Oct 2022 10:40 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 15th Oct 2022 10:40 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 15th Oct 2022 10:40 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sat 15th Oct 2022 10:40 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 15th Oct 2022 10:40 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sat 15th Oct 2022 10:40 am
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Sat 15th Oct 2022 10:40 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 15th Oct 2022 10:40 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sat 15th Oct 2022 10:40 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Sat 15th Oct 2022 10:40 am











