कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
राजेंद्र बोन्द्रे
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
- बातमी शेयर करा
फलटण.: दिनांक 3 जुलै 2026 रोजी मुंबई येथील विधान भवन मध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये फलटण शहरातील जलस्त्रोत नैसर्गिक जलाशय तळी यांचं पुनर्जीवन करणे याबाबत प्रश्न उपस्थित झालेला होता सदर प्रश्न हा फलटण तालुक्याच्या दुष्काळी परिस्थिती वर अत्यंत ज्वलंत आणि सत्य बाजू मांडणारा होता परंतु दुर्भाग्य असं की कथनी आणि करणी यामध्ये फरक यावेळेस दिसुन आला. फलटण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अनेक तळ्यांची यापूर्वी झालेली दुरावस्था तसेच फलटण शहराच्या आजूबाजूच्या भागांमध्ये (कोळकी, झिरपवाडी फरंदवाडी, तावडी) असलेल्या नैसर्गिक जलाशय ज्यामध्ये पाझर तलाव असतील नैसर्गिक तळी असतील यामध्ये झालेले अतिक्रमणे तसेच यामध्ये बिल्डर रोड कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत टाकण्यात आलेला राडारोडा याचे विरोधात अनेकदा प्रशासनामध्ये तक्रारी करून देखील प्रशासनामार्फत आज अखेर कोणतीही कारवाई झालेली नाही. याउलट भ्रष्ट प्रशासन स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता नैसर्गिक जलस्रोत तळी तलाव यांची विल्हेवाट लावणं त्याच्यामध्ये शहरात नव्याने सुरू असलेल्या सिमेंट रोड करिता उत्खनन करण्यात आलेले डांबर तसेच इतर राडारोडा टाकून सदर नैसर्गिक तळी आणि स्तोत्र मुजवण्याचं काम याच पाटलांच्या अधिपत्याखाली सुरू आहे. मुंबईत विधान मंडळात एक भूमिका आणि फलटणमध्ये एक भूमिका अशा परिस्थितीमुळे नागरिकांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अशाच प्रकारे सद्यस्थितीला फलटणमधील वनविभागाच्या जागेमध्ये नैसर्गिक तळे मुजवून त्या ठिकाणी उकरलेल्या रोडचे डांबर तसेच इतर राडारोडा टाकून सदर नैसर्गिक तळे मुजवण्याचा महापराक्रम वन विभागाने करून दाखवला आहे. तसेच सदर वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांना अशाप्रकारे नैसर्गिक तळे मुजवून त्या ठिकाणी तळे खोल करून त्याचं सुशोभीकरण करण्याच्या तसेच तळे मुजवल्यास गिरवी नाका परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन पूर परिस्थिती सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याबाबत सूचना तळे मुजविण्यापूर्वी वारंवार दिलेला होत्या परंतु वन विभागाने गांधारीची भूमिका घेऊन सदर नैसर्गिक शेततळे नेमकं कोणाच्या फायद्यासाठी मुजवले हे एक गौडबंगालच आहे. लवकरच त्याचाही सुगावा लागेल. बेंगलोर पॅटर्नचा विकास फलटणमध्ये नको आहे. निसर्गाचा ऱ्हास आणि भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचा विकास नको आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Thu 9th Jul 2026 04:58 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 9th Jul 2026 04:58 pm












