कांदाच्या विक्रीतून मिळालेले १८,६०,०००/- रुपयेची रोकड असलेली बॅग चोरी करणारे तीन युवकांना अटक
Satara News Team
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पुणे जिल्हयातील काही शेतकरी हे बेळगाव येथे कांदयाची विक्री करून टॅम्पोमधून प्रवास करीत गावी परतत असताना दि. ३/१२/२०२३ रोजी पहाटेच्या सुमारास वाढे ता.जि. सातारा येथे चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यावेळी काही जण चहा पिण्यासाठी गाडीतून उतरले होते तर काही गाडीमध्ये झोपलेले होते. त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटयाने सदर टॅम्पोमधून पैसे ठेवलेली बॅग चोरी करून तेथून पसार झाले होते. सदर चोरी झालेल्या बॅगेमध्ये एकूण १८,६०,०००/- रुपये होते. सदरची चोरी झालेची माहीती संबंधित शेतकरी यांना प्रवासादरम्यान समजलेने त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणेत येवून सदरची चोरी झालेबाबतची माहिती दिली. त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाणेस चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर घटनेची माहिती मिळताच मा. पोलीस अधिक्षक साो. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा.उप.वि. पोलीस अधिकारी साो किरणकुमार सुर्यवंशी, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे तात्काळ सातारा शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनेची सविस्तर माहिती प्राप्त करून सदर टॅम्पो चालकास प्रथम चौकशीकामी ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलीसांनी विचारलेल्या प्रश्नांना विसंगत अशी उत्तरे दिल्याने त्याचेवरील संशय अधिक बळावला गेला होता. त्याचेकडे अधिक कौश्यलपूर्वक विचारपूस केल्यानंतर त्याने त्याचे अन्य दोन साथीदारांना वाढे फाटा येथे बोलावून घेवून त्यांचेकडे सदरची बॅग चोरी करून दिली असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेचच इतर दोन युवकांची माहिती प्राप्त करून त्यांचे शोधणेकामी एक पथक दौंड तालुक्यात जावून त्यांनी ठिकठिकाणी छापे टाकून सदर गुन्हयातील दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे तपासादरम्यान चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केल्याचे सांगितले. सदर चोरी केलेल्या रक्कमेपैकी १७,९९,०४०/- रोख रक्कम त्यांचेकडून जप्त करण्यात आलेली आहे. सदरचा गुन्हा घडताच पोलीसांनी चोरी करणारे युवकांना तात्काळ ताब्यात घेवून चोरी झालेली रककम हस्तगत केल्याने संबंधित शेतकऱ्यांनी सातारा पोलीस दलाचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक सो, समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती आंचल दलाल, मा.उप.वि. पोलीस अधिकारी साो, किरणकुमार सुर्यवंशी, मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक श्री. संदीप जगताप यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.हवा. सुजित भोसले, निलेश जाधव, पो.ना. पंकज मोहिते पो.कॉ. संतोष घाडगे, रोहीत पवार, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष कचरे, सुशांत कदम यांनी केलेली आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 6th Dec 2023 06:18 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Wed 6th Dec 2023 06:18 pm











