श्रीपालवण मध्ये दिवाळी महोत्सव जल्लोषात....
श्रीपालवण येथे दिवाळी महोत्सव समिती व भैरवनाथ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी महोत्सव 2022 चे आयोजन केले होते.विशाल गुरव
- Sun 30th Oct 2022 06:04 am
- बातमी शेयर करा
दै, सातारा न्यूज
मलवडी, ता : २८
श्रीपालवण येथे दिवाळी महोत्सव समिती व भैरवनाथ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी महोत्सव 2022 चे आयोजन केले होते.
यंदाचे दिवाळी मोहत्सवाचे हे १३ वे वर्ष असून यामध्ये एसटी पूजन रक्तदान शिबिर, किल्ले स्पर्धा व महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. दि. 24 रोजी लक्ष्मीपूजन दिवशी सकाळी साडेसहा वाजता ग्रामीण व डोंगराळ भागातील प्रवासाचे एकमेव साधन असलेले लाल परी म्हणजेच एसटी चे पूजन करण्यात आले त्याचबरोबर एसटीचे चालक वाहक यांच्या प्रतिकृतज्ञता म्हणून त्यांचा यथोचित सत्कार ग्रामस्थांनी केला.
सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास 30 लोकांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास दिवाळी महोत्सव समितीमार्फत भेटवस्तू देण्यात आली.
दुपारी तीन वाजता किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात प्रेम शांताराम ढेंबरे यांनी बनवलेल्या किल्ल्याला प्रथम क्रमांक मिळाला.
संध्याकाळी आठ वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून प्रतीक्षा अमर कदम या होम मिनिस्टर ठरल्या त्यांना मानाची पैठणी मिळाली.
द्वितीय क्रमांक रूपाली किसन निर्मळ , तृतीय क्रमांक लता नामदेव ढेंबरे यांनी पटकावला.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी किरण ढेंबरे , विशाल कदम व अध्यक्ष वैभव चव्हाण, तसेच वैभव ढेंबरे (पोलीस पाटील) यांनी विशेष परिश्रम घेतले

स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 30th Oct 2022 06:04 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 30th Oct 2022 06:04 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 30th Oct 2022 06:04 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 30th Oct 2022 06:04 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 30th Oct 2022 06:04 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 30th Oct 2022 06:04 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 06:04 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 06:04 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 30th Oct 2022 06:04 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 30th Oct 2022 06:04 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 30th Oct 2022 06:04 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 06:04 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 30th Oct 2022 06:04 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 30th Oct 2022 06:04 am













