वाई डिबी ने वाहन चोरट्याच्या आवळल्या मुसक्या ; २ दुचाकी हस्तगत
बापू वाघ
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
- बातमी शेयर करा
वाई : वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या खास बातमीदारांमार्फत गोपनीय बातमी प्राप्त झाली की, वाई पोलीस ठाणे गु.र.नं ९०/२०२४ भा.द.वि.सं ३७९ प्रमाणे वाहनचोरीचा गुन्हा नोंद
असुन, त्यातील संशयित आरोपी हा बावधन नाका परिसरात येणार असुन, त्यास ताब्यात घेण्याच्या सुचना वाई तपासपथकातील अधिकारी अंमलदार यांना देण्यात आल्याने वाई तपासपथकाने बावधन नाका परिसरात सापळा
रचुन एका संशयित इसमास वाहन क्र एमएच ११ सीवाय ७८२७ हिच्यासह ताब्यात घेतले तेव्हा संशयित इसमास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव सोन्या उर्फ प्रितम सुनिल शिंदे रा गंगापुरी ता वाई असे सांगुन सदरचे वाहन त्याने वाई मंडई येथुन चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडे अधिकची विचारपसु करता, त्याने दिनांक ०७ रोजी सिव्हील हॉस्पीटल सातारा येथुन काळया रंगाची स्पेल्डर क्र एमएच ११
बीजे ०६१० ही देखील चोरी केल्याचे सांगितल्याने सदरबाबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ३५७ /२०२४ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने सदरच्या ०२ मोटार सायकल त्याच्या ताब्यातुन जप्त करण्यात आल्या आहेत. असा एकुण ०१ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या ०२ मोटारसायकल त्याच्याकडुन हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी वाई बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र शहाणे पोलीस निरीक्षक वाई पोलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक वैभव पवार पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, सुधीर वाळुंज पो.ना राहुल भोईर पो.शि प्रसाद दुदुस्कर, राम कोळी, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड, धिरज नेवसे, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Fri 19th Apr 2024 03:08 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 19th Apr 2024 03:08 pm











