‘किसन वीर-खंडाळ्या’चे ऊस बील जमा ५ कोटी ७४ लाख ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; प्रमोद शिंदे
Satara News Team
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
- बातमी शेयर करा
खंडाळा : खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाकडे सन २०२३-२४ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसास प्रतिटन ३ हजार रूपयांप्रमाणे पहिल्या पंधरा दिवसांचे बील ५ कोटी ७४ लाख ८४ हजार ६६८ रूपये संबंधित सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ चा गळीत हंगाम ११ नोव्हेंबरपासून सुरू झालेला होता. ११ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत पहिल्या पंधरा दिवसांमध्ये १९ हजार १६१ मेट्रिक टनाचे गाळप झालेले होते. प्रतिटन ३ हजार रूपयांप्रमाणे ५ कोटी ७४ लाख ८४ हजार ६६८ रूपये वर्ग करण्यात आले आहे. किसन वीर कारखान्याप्रमाणेच खंडाळा कारखान्यासही कोणतीच बँक वित्तपुरवठा होत नाही. त्यामुळेच दोन्ही कारखान्यांची बीले वर्ग करण्यास थोडासा विलंब झाला होता. परंतु यापुढील पंधरवड्याची बीले लवकरात लवकर वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. किसन वीर कारखान्याचा ३ हजार रूपये दर जाहिर केल्यानंतर खंडाळा कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांच्यामध्ये दराबाबत साशंकता होती. किसन वीरच्या सभासदांना ३ हजार रूपयांचा दर जाहिर केला आहे त्याप्रमाणेच खंडाळा कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्याबाबत किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे महत्वपुर्ण काम केले असल्याचे यावेळी सांगितले. कारखाना कार्यक्षेत्रातील सुज्ञ सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांची कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस हा किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा काखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे व संचालक मंडळाने केले आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 8th Feb 2024 04:25 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 8th Feb 2024 04:25 pm













