शिंदेशाही वर विधानसभेत शिक्कामोर्तब
शिंदे-भाजप गट १६४ तर महाविकास आघाडी ९९Satara News Team प्रकाश शिंदे
- Mon 4th Jul 2022 06:58 am
- बातमी शेयर करा
शिवसेनेच्या ५५ पैकी ३९ आमदारांचे पाठबळ असलेल्या शिंदे गटालाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे
सातारा न्यूज मुंबई:-एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारने आज सोमवार दि.४ जुलै रोजी विश्वासदर्शक ठराव जिंकत विधानसभेत बहुमत सिद्ध केले.शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने १६४ सदस्यांनी मतदान केले.शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक जिंकला. यामुळे गेली १३ दिवसांहून अधिक काळ चालेल्या सत्तासंघर्षाला आता विराम मिळाला आहे.
रविवारी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर बहुमताने विजयी झाले होते. त्यांना १६४ मते तर त्यांच्या विरोधात उभे असलेले राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. या निवडणुकीत नार्वेकरांनाच मत देण्यासाठी शिवसेना पक्षाने आपले सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांना व्हीप बजावला होता. हा व्हीप पक्षाच्या उर्वरित १६ आमदारांना देखील लागू असेल, असे व्हीपमध्ये म्हटले होते. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी भाजपच्या राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करून शिवसेनेचा व्हिप पाळला नाही.
शिंदे गट हाच शिवसेनेचा अधिकृत विधिमंडळ पक्ष; विधानसभा अध्यक्षांचा निर्णय
शिवसेनेच्या ५५ पैकी ३९ आमदारांचे पाठबळ असलेल्या शिंदे गटालाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब केले आहे. शिवसेनेचे अजय चौधरी यांचे गटनेतेपद आणि सुनील प्रभू यांचे मुख्य प्रतोदपदही रद्द ठरवले होते.
शिंदे गटाला शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता
शिंदे गटाला शिवसेनेचा विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता देत विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेला धक्का दिला होता. या निर्णयामुळे सेनेच्या १६ आमदारांना सोमवारी बहुमत चाचणीवेळी शिंदे गटाचा व्हिप मान्य करून सरकारच्या बाजूने मतदान करावे लागेल. त्यांनी शिंदे गटाच्या विरोधात मतदान केल्यास आदित्य ठाकरे यांच्यासह सेना आमदारांची आमदारकीच धोक्यात येऊ शकते. व्हिपविरोधात मतदान केले म्हणून विधानसभा अध्यक्ष त्यांना निलंबित करू शकतात. अर्थात त्यानंतर शिवसेना सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल. तसे शिवसेनेने आधीच जाहीर केले होते.
vidhansabha
#eknathshinde
#bjpsatara
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 4th Jul 2022 06:58 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 4th Jul 2022 06:58 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 4th Jul 2022 06:58 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 4th Jul 2022 06:58 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 4th Jul 2022 06:58 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 4th Jul 2022 06:58 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 4th Jul 2022 06:58 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 4th Jul 2022 06:58 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 4th Jul 2022 06:58 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 4th Jul 2022 06:58 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 4th Jul 2022 06:58 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 4th Jul 2022 06:58 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 4th Jul 2022 06:58 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 4th Jul 2022 06:58 am













