सेनॉर चौक सातारा येथे कोयता नाचून दहशत करणारी टोळी शाहूपुरी पोलिसांकडून जेरबंद
Satara News Team
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये शनिवारी १ जुलै 2023 रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास सेनॉर चौक सातारा येथे पाच इसमांनी ओमकार पिलाजी पवार यांना कोयत्याचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 2800 रुपये रोकड जबरदस्ती काढून घेतली होती त्याचबरोबर त्याच्यासोबत असलेल्या चार चाकी वर कोयत्याने मारून गाडी फोडून दहशत पसरवली होती अशी तक्रार ओंकार पिलाजी पवार यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती
सदरचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस अधीक्षक श्री समीर शेख माननीय पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक श्री बापू बांगर मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किरण कुमार सूर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक श्री संजय पतंगे सह पोलीस निरीक्षक श्री प्रशांत बद्दे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला कोयता नाचून दहशत माजवणाऱ्या आरोपींना शोध घेऊन तत्काळ अटक करण्याबाबत सांगितले होते
या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हे म्हसवे येथे वेण्णा नदीच्या परिसरातील शेतात लपुन बसले आहेत. माहिती मिळताचत्यानुसार म्हसवे येथील वेण्णा नदीच्या परिसरात पाउस चालु असताना नदीकाठील परिसरात आरोपींचा सलग सात ते आठ तास उसाचे शेतात व ओढेनाल्यात शोध घेत असताना एका उसाचे शेतात संशयित चार आरोपी बसलेले दिसुन आले .त्यांचा चिखलातून पाठलाग करुन तीन आरोपींना पकडण्यात यश आले. त्यापैकी एक आरोपी उसाचे शेतातुन पळुन गेला. पळुन गेलेल्या एका आरोपीचा सलग रात्री उशीरापर्यंत शोध घेवुन त्यास पिलेश्वरी नगर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर चारही आरोपींना पोलीस ठाणेस हजर करुन त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुशंगाने कसुन तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. व आरोपी क्र.5 सौरभ नितीन सपकाळ यास तांत्रिक माहितीच्या आधारे शिराळा जि.सांगली येथून ताब्यात घेवुन गुन्ह्याचे कामी हजर केले आहे. सदर आरोपीकडून दहशत माजविण्यासाठी वापरलेला कोयता, लोखंडी पाईप, दोन दुचाकी व 2100 रु. रक्कम असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अशाप्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने 24 तासात गोपनीय माहितीच्या व तांत्रिक माहितीच्या आधारे सँनॉर चौक सातारा येथे कोयता नाचवुन दहशत माजविणा-या आरोपींना अटक करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला
आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बापु बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक श्री. संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत बधे, पोहवा. सुरेश घोडके, सचिन माने, पोलीस नाईक निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे यांनी केली आहे.
कोयता नाचवुन दहशत माजविणारे अटक आरोपी
1 सौरभ नितीन सपकाळ वय 25 वर्षे 19 रघुनाथ पुरा पेठ करंजे
2 ऋतिक धनंजय पंडित वय 21 राहणार गडकर आळी कळकाच्या बेटाजवळ शाहूपुरी
3 अक्षय संतोष कदम वय 20 राहणार 36 करंजे पेठ सातारा
4 आतिश गौतम राजगुरू वय 22 वर्ष राहणार दौलत नगर सातारा
एक आरोपी अल्पवयीन आहे
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 5th Jul 2023 07:29 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Wed 5th Jul 2023 07:29 pm











