रेकॉर्ड ब्रेक गर्दीमध्ये श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांचा पारायण सोहळा सुरू.

तब्बल तीन वर्षानंतर श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या रथ सोहळ्याला येणार महाराष्ट्रातून भाविक भक्तगण.

वाठार स्टेशन :  महाराष्ट्रातील भावी भक्तांचे श्रद्धास्थान समजले जाणारे वाठार स्टेशन येथील श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षी रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते परंतु गेली तीन वर्षे झाले भारतावरती आलेल्या मोठ्या महाभयंकर कोरोना या आपत्तीमुळे रथोत्सव घेण्यात आला नव्हता मात्र यावर्षी श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या ८७ व्या पुण्यतिथी निमित्ताने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व ५ जानेवारी रोजी रथोत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे.
या पारायण सोहळ्याचे वैशिष्ट्य पाहता महाराष्ट्रातून ज्येष्ठ व श्रेष्ठ कीर्तनकारांची यावेळी या पारायण सोहळ्यामध्ये मांदियाळी पहावयास मिळाली गेली तीन वर्षे पारायण सोहळा छोटेखानी झाल्यामुळे  यावर्षी वाठार स्टेशन नागरिक व महाराष्ट्रातील भावी भक्तगणांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे तसे पाहिले तर या रथोत्सवामध्ये उंट, घोडे,  नामांकित बँड तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत संपूर्ण वाठार नगरीत हा रथ फिरवण्यात येतो
श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या पारायण सोहळ्यामध्ये यावर्षी महाराष्ट्रातील ज्येष्ठ व नामवंत कीर्तनकार यांची मांदयाळी पहावयास मिळाली व या कीर्तनांना वाठार स्टेशन पंचक्रोशीमधील नागरिकांनी तोबा गर्दी करून तसेच रेकॉर्ड ब्रेक गर्दी करून कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत केली.
यावर्षी श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या ८७ व्या पुण्यतिथी निमित्ताने 5 जानेवारी रोजी सकाळी १० वाजता रथ पूजन बालयोगी श्री. सदानंद महाराज, तीर्थक्षेत्र परशुरामकुंड, तुंगारेश्वर पर्वत, ता. वसई, जि. पालघर यांच्या शुभहस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. 
वाठार स्टेशन नगरीमध्ये या होणाऱ्या ५ जानेवारीच्या रथ यात्रा सोहळ्याची मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी नागरिक करताना दिसून येत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला