घोलपवाडी ता. कराड येथे सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी श्री हनुमान मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम
Satara News Team
- Fri 26th May 2023 02:56 pm
- बातमी शेयर करा
घोलपवाडी : ता. कराड येथे सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी श्री हनुमान मंदिराची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम श्री तीर्थक्षेत्र पुसेगावचे प.पू. सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे महंत मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज यांच्या शुभहस्ते, माजी सहकार व पणन मंत्री, आमदार बाळासाहेब पाटील व मार्केट कमिटीचे संचालक मानसिंगराव जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे शनिवार दिनांक २७ रोजी सायंकाळी ४ ते ९ कळस व गंगा कलश ग्राम प्रदक्षिणा, रात्री ९ वाजता प्रसाद, रात्री १० वाजता घोलपवाडी व पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे भजन. रविवार दिनांक २८ रोजी सकाळी ८ ते ११ ध्वजारोहण, प्रायचित्त विधी, गो-पूजन, पुण्याहवाचन, मुख्यपीठ पूजन, नवग्रह मंडल व सर्व मंडल स्थापना, महारुद्र महाहनुमान अभिषेक, महापूजा, यज्ञकुंड पूजन. दुपारी २ ते ६ प्रधान कलशाचे सर्व स्नान, संस्कार सर्व मंदिर निवास व श्रीकांत जोशी यांचे मंदिरविषयक मार्गदर्शन व आरती. सायंकाळी ७ नंतर प्रसाद, रात्री ९ वाजता ह. भ. प. परमपूज्य उमेश महाराज दशरथे आळंदी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
सोमवार दिनांक २९ रोजी सकाळी ९ ते ११ प्रधानदेवतेला महाअभिषेक स्नान, प्रधान देवता पूजन, सकाळी ११ ते दुपारी १ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण व महाआरती. दुपारी १ वाजता महाप्रसाद, रात्री ९ ते ११ ह. भ. प. परमपूज्य उमेश महाराज दशरथे आळंदी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. या सर्व कार्यक्रमास पुरोहित म्हणून रमाकांत जोशी गुरुजी व सहकारी कराड हे काम पाहणार आहेत.
या कार्यक्रमांचा माहेरवाशीनींनी, ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट घोलपवाडी, सरपंच व सर्व सदस्य ग्रामपंचायत घोलपवाडी व जय हनुमान भजनी मंडळ घोलपवाडी यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 26th May 2023 02:56 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Fri 26th May 2023 02:56 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 26th May 2023 02:56 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 26th May 2023 02:56 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 26th May 2023 02:56 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 26th May 2023 02:56 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 26th May 2023 02:56 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 26th May 2023 02:56 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 26th May 2023 02:56 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 26th May 2023 02:56 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 26th May 2023 02:56 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 26th May 2023 02:56 pm













