साता-यात ऊसदर आंदोलन पेटलं ,अंदोलकानी उसाचा भरलेला ट्रॅक्टर पेटवला
कुणाल खंदारे - Thu 17th Nov 2022 06:19 am
- बातमी शेयर करा
कराड : सातारा जिल्ह्यात ऊस दर जाहीर होत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटलं. इंदोली- कराड गावाजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर अज्ञात आंदोलकांनी मध्यरात्री पेटवला. जयवंत शुगरचा कारखान्याला ऊस पोहचविणाऱ्या ट्रक्टरला आग लावण्यात आली आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील ऊस दराचे आंदोलन पेटले. आज अनेक संघटना फडात जाऊन ऊस तोड बंद करणार आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठकी घेतल्या होत्या. तसेच सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने हे शेजारील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा कमी दर देत आहेत, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इंदोली येथे जयवंत शुगरला घेवून जाणाऱ्या ट्रक्टरला पेटविल्याची घटना घडली. यामध्ये ट्रक्टरचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची माहिती उंब्रज पोलिस माहिती घेत असून अद्याप तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे. उंब्रज पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष यांना ताब्यात आहे. पोलिसांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ऊसतोड आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 17th Nov 2022 06:19 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 17th Nov 2022 06:19 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 17th Nov 2022 06:19 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 17th Nov 2022 06:19 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 17th Nov 2022 06:19 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 17th Nov 2022 06:19 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 17th Nov 2022 06:19 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 17th Nov 2022 06:19 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 17th Nov 2022 06:19 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 17th Nov 2022 06:19 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 17th Nov 2022 06:19 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 17th Nov 2022 06:19 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 17th Nov 2022 06:19 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 17th Nov 2022 06:19 am













