महाबळेश्वर तालुक्यात परतीच्या पावसाचा हाहाकार
शुक्रवार रात्रीच्या मुसळधारेने स्ट्रॉबेरी शेती जलमय झाल्याने आतोनात नुकसान
लहू चव्हाण - Sun 23rd Oct 2022 07:40 am
- बातमी शेयर करा
शुक्रवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून पावसाच्या या अस्मानी संकटाने स्ट्रॉबेरी शेती पूर्णपणे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. याचबरोबर वाटाणा आणि बटाटा पीक हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला आहे.
परतीच्या पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादकांना मोठा फटका बसला असून सततच्या पावसाने अगोदरच शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीची लागवड करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. काही शेतकऱ्यांनी अद्याप लागवड केली नाही. बऱ्याचदा दिवाळीत स्ट्रॉबेरी विक्रीचा शुभारंभ अनेक शेतकरी करतात. परंतु यंदा पावसामुळे लागवड उशिरा झाली अजूनही काही शेतकरी लागवड करीत आहेत.
आज रात्री झालेल्या मुसळधार पावसाने स्ट्रॉबेरी शेतात पाणी साचल्याने रोपांना रोगराईचा धोका निर्माण झाला आहे. भिलार, गुरेघर, भोसे, खिंगर, राजपूरी , आंब्रळ, मेटगुताड, पांगारी परिसरात स्ट्रॉबेरी शेतीत पाणी साचलेने शेतकरी हंगामापूर्विच आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे या शेतकरयांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान खिंगर , गोडवली गावातील पिकांच्या नुकसानीची पाहणी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी केली. यावेळी खिंगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विठ्ठल दुधाने,अशोक दुधाने, शंकरराव कळंबे, सुभाष कासूर्डे व शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राजेंद्र राजपुरे यांनी केली आहे
गोडवली येथील नितीन मालुसरे यांच्या शेतीच्या वरच्या बाजूला असणाऱ्या धनदांडग्या लोकांच्या बंगल्याची संरक्षक भिंत पाण्याने कोसळून सर्व पाणी शेतात घुसले. त्यामुळे मालुसरे यांच्या स्ट्रॉबेरीचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. त्यामुळे सबंधित मालकाने मालुसरे यांना भरपाई द्यावी अशी मागणी मालुसरे यांनी केली आहे.

स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 23rd Oct 2022 07:40 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 23rd Oct 2022 07:40 am













