महाबळेश्वरच्या विकासस्वप्नाला अखेर हिरवा कंदील!

लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या जिद्द, दूरदृष्टी आणि कायदेशीर लढ्याला यश; नव्या प्रशासकीय इमारतीचा मार्ग अखेर मोकळा
महाबळेश्वरच्या विकासाचा ऐतिहासिक टप्पा • न्यायालयीन अडथळ्यांवर यशस्वी मात • नगररचना विभागाकडून सुधारित आराखड्यास मंजुरी • शाळांची एकही इमारत न पाडता नव्या प्रशासकीय इमारतीला परवानगी • सर्व शासकीय सेवा एकाच प्रशासकीय संकुलात उपलब्ध होणार • लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश “सदैव महाबळेश्वरचा विकास हाच ध्यास… जनतेच्या विश्वासाला विकासाने दिलेले उत्तर!”

महाबळेश्वर : महाबळेश्वर शहराच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. अनेक अडथळे, न्यायालयीन लढाया आणि प्रशासकीय प्रक्रियांवर यशस्वी मात करत महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नगररचना विभागाने सुधारित आराखड्याला मंजुरी दिल्याने शहराच्या विकासाच्या इतिहासात एक महत्त्वपूर्ण अध्याय लिहिला गेला आहे.

या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विविध कारणांनी न्यायालयीन आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र, लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता कायदेशीर मार्गाने लढा सुरू ठेवला. कोल्हापूर खंडपीठातील न्यायालयीन प्रक्रियेनंतर नगरपरिषदेची भूमिका योग्य ठरली आणि प्रकल्पावरील मोठा अडथळा दूर झाला. त्यानंतर नगराध्यक्षांनी तातडीने सुधारित मास्टर प्लॅन तयार करून नगररचना विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला.

या आराखड्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सदर भूखंडावरील इतर शाळांच्या इमारती न पाडता नवीन प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित अबाधित ठेवत शहराच्या विकासालाही गती देण्यात यश आले आहे. विकास आणि जनहित यांचा समतोल साधणारा हा निर्णय म्हणून पाहिला जात आहे.

प्रस्तावित प्रशासकीय संकुलामुळे विविध शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. आधुनिक, प्रशस्त आणि सर्व सुविधांनी युक्त प्रशासकीय संकुलामुळे महाबळेश्वरच्या प्रशासनाला नवे बळ मिळणार असून नागरिकांच्या कामकाजातही मोठी सुलभता येणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी दाखविलेली जिद्द, सातत्यपूर्ण पाठपुरावा, कायदेशीर लढाई आणि विकासाबद्दलची दूरदृष्टी यामुळे हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणे शक्य झाले, अशी भावना शहरातील नागरिक, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. महाबळेश्वरच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेतृत्वाला मिळालेले हे यश शहराच्या भविष्यासाठी आशादायी मानले जात आहे.

महाबळेश्वरला आधुनिक प्रशासनाची नवी ओळख देणारा हा प्रकल्प केवळ एका इमारतीपुरता मर्यादित नसून, येणाऱ्या अनेक दशकांच्या विकासाचा पाया ठरणार आहे. “एक शहर – एक प्रशासन” ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल पडले आहे.


आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला