रामकृष्णनगर ( काशीळ) येथे जुगार अड्डयावर छापा.
८ जणांसह लाखोंचा मुद्देमाल घेतला ताब्यात.
सतिश जाधव- Sun 12th Feb 2023 10:08 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : रामकृष्णनगर ( ता. सातारा ) गावच्या हद्दीत बिरोबा मंदिराच्या मोकळ्या जागेत बेकायदा तीन पानी जुगार खेळणाऱ्या ८ जणांना आज बोरगाव पोलीसांनी ताब्यात घेऊन जुगारातील रोख , मोबाईल तसेच मोटारसायकलींसह पावणेचार लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी स. पो. नि. रविंद्र तेलतुंबडे यांना गोपनीय बातमी मिळाली. रामकृष्णनगर ( ता. सातारा ) गावच्या हद्दीत बिरोबा मंदिराजवळच्या मोकळ्या मैदानात करंजाच्या झाडाखाली काहीजण जुगार खेळत आहेत. त्यावरून डि. बी पथकास योग्य त्या सुचना देऊन कारवाई करण्यास सांगितले. डी. बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी तीन पानी जुगार अड्डयावर केलेल्या कारवाई मध्ये गणेश गुलाब कारंडे रा. अतित, भानुदास मसू कुऱ्हाडे, रा रामकृष्णनगर, नंदकुमार उत्तम पवार रा. बांबवडे, राजेंद्र मनोहर सुतार रा शिरगांव, विष्णु बापूराव कोळेकर रा काशिळ ,प्रदिप विनायक निंबाळकर रा. तुकाईवाडी, लहू रामचंद्र मोरे ,रा चिंचणेर (निंब) , तानाजी शामराव माने रा. काशिळ ता. सातारा , अशा ८ इसमांना जुगार खेळताना जागीच ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगारातील रोख रकमेसह मोबाईल व मोटारसायकलीसह ३,७३५०० रूपयेचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
सदरची कारवाई स. पो नि. रविंन्द्र तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा, घाडगे, पो. कॉ. गायकवाड, तसेच डी. बी पथकातील कर्मचारी पो. ना. दादा स्वामी, किरण निकम, पो. कॉ प्रशांत मोरे यांनी केली.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 12th Feb 2023 10:08 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 12th Feb 2023 10:08 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 12th Feb 2023 10:08 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 12th Feb 2023 10:08 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 12th Feb 2023 10:08 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 12th Feb 2023 10:08 am
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Sun 12th Feb 2023 10:08 am
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 12th Feb 2023 10:08 am
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Sun 12th Feb 2023 10:08 am
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Sun 12th Feb 2023 10:08 am
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 12th Feb 2023 10:08 am
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Sun 12th Feb 2023 10:08 am
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Sun 12th Feb 2023 10:08 am











