भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे उद्या साताऱ्यात होणार जंगी स्वागत
Satara News Team
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे शनिवारी दुपारी दोन वाजता शिरवळ येथे आगमन होत असून खंडाळा तालुक्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचे जंगी स्वागत करून त्यांना शुभेच्छा देणार आहेत. धैर्यशील कदम यांच्या स्वागतासह पदग्रहण समारंभ येथील साताऱ्यात एका खाजगी हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
खंडाळा येथे कदम यांचे स्वागत होणार असून पुढे कवठे तालुका वाई येथे देशभक्त किसन वीर आबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे. दुपारी तीन वाजता साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते कदम यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देणार आहेत. त्यानंतर पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाणार आहे.
येथील हॉटेल लेक व्ह्यू येथे साडेतीन वाजता धैर्यशील कदम पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. धैर्यशील कदम यांना जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आल्यामुळे भाजप जिल्हा कार्यकारणी मध्ये विशेषत: कराड उत्तर मतदार संघामध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमास आमदार जयकुमार गोरे हे उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
संबंधित बातम्या
-
पदांसाठी मुलाखतींना चंद्रकांत जाधव यांचा कडाडून विरोध
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Fri 21st Jul 2023 09:37 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Fri 21st Jul 2023 09:37 pm













