विद्यार्थी व शिक्षकांच्या गुणगौरवाने शिक्षण महोत्सवाची सांगता
प्रमोद रांजणे
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
- बातमी शेयर करा
महाबळेश्वर : पंचायत समिती महाबळेश्वर शिक्षण विभाग यांच्या वतीने दिनांक 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी या कालावधीत शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महाबळेश्वर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री आनंद पळसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडी, शिक्षक कवी संमेलन, विद्यार्थी कवी संमेलन, विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम, शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे शिक्षण महोत्सवात आयोजन करण्यात आले. आज समारोपाच्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रसिद्ध व्याख्याते मा.श्री शिवाजी राऊत सर यांचे नवीन शैक्षणिक धोरण समजून घेताना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये मा. श्री शिवाजी राऊत सर यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या दृष्टिकोनातून असलेल्या विविध बाबींवर प्रकाश टाकला. नवीन शैक्षणिक धोरणातील चांगल्या बाबी व त्रुटी या दोन्ही बाबींवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मा.श्री रामचंद्र कोरडे सर हे उपस्थित होते. यांनी सुद्धा उपस्थित सर्वांना एकूणच शिक्षण प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. आपल्या मनोगतातून शिक्षण महोत्सव आयोजना बद्दल शिक्षण विभागाचे कौतुक केले. शिक्षण महोत्सवातील अनेकविध चांगल्या बाबींचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.संजय सपकाळ सर यांनी केले.
तदनंतरच्या सत्रात विद्यार्थी ,शिक्षक,पालक यांच्यासाठी मुलं शिकू शिकतं - सकारात्मक नकारात्मक बाबी या विषयावर परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात मा.श्री. नवनाथ लोखंडे सर ( शिक्षक - माण ) मा.श्री.मारुती शिंदे (पालक - माचुतर ) मा.श्री. दत्तात्रय कांबळे (शा.व्य.स. - क्षेत्र महाबळेश्वर) यांनी सहभाग घेतला. मूल शिकू शकत या विषया संदर्भात शिक्षक म्हणून काय करतो व काय करायला हवं. शिकण्यामधील मुलाची मानसिकता या विषयावर लोखंडे सर यांनी मार्गदर्शन केले. पालक म्हणून मुलाकडून वाढत्या अपेक्षा कमी करायला हव्या व घरात सकारात्मक वातावरण निर्माण करायला हवे. असे मत मा.श्री.मारुती शिंदे यांनी व्यक्त केले. तसेच शाळा व्यवस्थापन समिती मूल शिकण्यासाठी काय करू शकते. या विषयावर मा.श्री.दत्तात्रय कांबळे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित प्रेक्षकांनी ही प्रश्न विचारून परिसंवादात सहभाग घेतला. या परिसंवादाच्या शेवटी गटशिक्षणाधिकारी मा.श्री.आनंद पळसे साहेब व मा.श्री सुनील पार्टे साहेब सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर यांनी अधिकारी म्हणून काय भूमिका असावी याबाबत मार्गदर्शन केले. सदर परिसंवादाचे सूत्रसंचालन श्री. पुरुषोत्तम माने श्री.अमित कारंडे यांनी केले.
समारोपाच्या सत्रात शिक्षण महोत्सवातील विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी मा.श्री.प्रवीण भिलारे मा.सौ. डॉ.तेजस्विनी भिलारे मा.श्री.एम.पी. फाळणे मा.श्री.गुलाब गोळे मा.श्री.संजय मोरे मा.श्री.सुनील पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते. समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी मा.श्री.आनंद पळसे साहेब यांनी केले. तर मा.श्री प्रवीण भिलारे मा.सौ.तेजस्विनी भिलारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगता मध्ये शिक्षण महोत्सव आयोजनाचे आणि सुव्यवस्थित नियोजनाचे भरभरून कौतुक केले. सदर शिक्षण महोत्सव सातारा जिल्ह्यासाठी आदर्श असेल असा आशावाद व्यक्त केला. व सदर शिक्षण महोत्सव आयोजनासाठी सर्वांच्या वतीने मा.श्री.आनंद पळसे साहेब सन्मान करण्यात आला.तसेच शिक्षण महोत्सवातील शैक्षणिक स्टॉल, बाल साहित्य संमेलन, शिक्षक साहित्य संमेलन, विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम, शिक्षक कवी संमेलन,शिक्षक सांस्कृतिक कार्यक्रम या मधील सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षक जिल्हास्तरावरील गुणवंत विद्यार्थी व शिक्षक तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानातील प्रथम क्रमांकाच्या २३ शाळा, आदर्श शाळा अशा जवळपास 200 हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार श्री.प्रकाश मोरे सर यांनी तर सूत्रसंचलन श्री.पुरुषोत्तम माने व श्री.संजय संकपाळ यांनी केले. अशा उत्साही व आनंददायी वातावरणात शिक्षण महोत्सवाची सांगता झाली..
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 17th Feb 2024 01:38 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 17th Feb 2024 01:38 pm













