श्री सेवगिरी यात्रा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार.! ग्रामस्थांचा निर्धार
निसार शिकलगार- Mon 7th Nov 2022 07:18 am
- बातमी शेयर करा
पुसेगाव: येथील श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त डिसेंबर २०२२ मध्ये पार पडणाऱ्या वार्षिक यात्रेतील सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याचा एकमुखी निर्धार श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये केला.
श्री सेवागिरी मंदिरातील प. पू. नारायणगिरी भक्त निवास हॉल येथे श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चेअरमन बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेस मठाधिपती सुंदरगिरी महाराज, विश्वस्त गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, सरपंच विजय मसणे, माजी चेअरमन ॲड. विजयराव जाधव, सुनीलशेठ जाधव, शिवाजीराव जाधव, जगनशेठ जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेला फार मोठी चांगली परंपरा आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे यात्रा बंद होत्या. मात्र या वर्षीच्या यात्रेला भाविकांची गर्दी होणार आहे. यात्रेतील सर्व कार्यक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करू असे मत विश्वस्त डॉ. सुरेश जाधव यांनी व्यक्त केले.
श्री सेवागिरी महाराजांची यात्रा म्हणजे ग्रामीण, शहरी भागातील भाविक व व्यावसायिकांसाठी पर्वणी असते. म्हणूनच ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेचे नियोजन करताना व्यावसायिकांना कमी खर्चात जादा सवलती उपलब्ध करून द्याव्यात. त्यामुळे भाविक, यात्रेकरूंना कमी खर्चात सोयी सुविधा उपलब्ध होतील. तसेच ट्रस्टने आर्थिक नियोजन करून देवस्थानचा स्वनिधी तयार करावा. भविष्यात तोच निधी विकासकामांसाठी वापरता येईल अशी सूचना ॲड. विजयराव जाधव यांनी मांडली.
श्री सेवागिरी महाराजांच्या प्रसारासाठी साहित्य निर्मिती, मुख्य रथ मार्गावर बंदिस्त एअर पंच केबल वापरावी असे मत शिवाजीराव जाधव यांनी व्यक्त केले. श्री सेवागिरी महाराजांच्या पारंपरिक यात्रेला ग्रामीण व नाविन्यतेचा बाज आहे. यासाठी "खिल्लार महोत्सवाचे" आयोजन करावे. तसेच श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेतील प्रत्येक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसारित करावे. यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई आयटी क्षेत्रातील गर्दी या यात्रेकडे आकर्षित होईल अशी सूचना प्रकाश जाधव यांनी मांडली. बैलगाडी शर्यतीमध्ये लॉट न पाडता चिठ्ठ्यांवर लॉट पाडले जावेत, या कार्यपद्धती मुळे कोणत्याही बैलगाडी मालकांवर अन्याय होणार नाही, याबाबत काळजी घेणेत यावी असे मत प्रशांत जाधव व संग्राम देशमुख यांनी मांडले.
चेअरमन बाळासाहेब जाधव म्हणाले, श्री सेवागिरी महाराजांच्या ७५ व्या पुण्यस्मरणानिमित्त होणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेतील प्रत्येक कार्यक्रमांचे नियोजन ग्रामस्थांच्या मदतीने केले जाईल. भाविक, यात्रेकरू, व्यवसायिकांना श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत व प्रशासनाच्या मदतीने सर्व सुविधा पुरविल्या जातील. श्री सेवागिरी महाराजांच्या प्रमुख रथ मार्गावरील दुरवस्था झालेल्या रस्त्याचे काम ही पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून डांबरीकरण यात्रेपूर्वी पूर्ण केले जाईल असे सांगितले.
विश्वस्त संतोष वाघ यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन सचिव विशाल माने यांनी केले. विश्वस्त गौरव जाधव यांनी आभार मानले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 7th Nov 2022 07:18 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 7th Nov 2022 07:18 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 7th Nov 2022 07:18 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 7th Nov 2022 07:18 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 7th Nov 2022 07:18 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 7th Nov 2022 07:18 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 7th Nov 2022 07:18 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 7th Nov 2022 07:18 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 7th Nov 2022 07:18 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 7th Nov 2022 07:18 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 7th Nov 2022 07:18 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 7th Nov 2022 07:18 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 7th Nov 2022 07:18 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 7th Nov 2022 07:18 am













