एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान
Satara News Team
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
- बातमी शेयर करा
मसूर : एम आय टी राष्ट्रीय सरपंच संसदेच्या महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र तसेच ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह सातारा येथे नुकताच संपन्न झाला.
यावेळी एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदचे प्रमुख समन्वयक श्री. योगेशजी पाटील, संस्थेचे सहसमन्वयक श्री. प्रकाशराव महाले, पुणे विभाग महिला समन्वयक श्रीमती भक्तीताई जाधव, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री.विक्रम जाधव, बी व्ही जी चे संचालक श्री. संदेश पोतेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी श्री. योगेशदादा पाटील यांनी राष्ट्रीय सरपंच संसद- एम आय टी चे स्वरूप आणि त्याचे कार्य तसेच उद्योग जगतातील सेसफंड ग्रामपंचायतींना कशा पद्धतीने वर्ग करता येईल या विषयी मार्गदर्शन केले. भक्तीताई जाधव यांनी महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय सरपंच संसद एम आय टी च्या माध्यमातून महिलांना गाव पातळीवर कशा पद्धतीने काम करता येईल हे त्यांनी त्यांच्या प्रेरणादायी भाषणातून व्यक्त केले. श्री. प्रकाशराव महाले साहेबा यांनी शेती विषयक अभ्यासूपणे संवाद साधला,
यावेळी कराड तालुका समन्वयक श्री. प्रशांत पाटील यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या पिकाला रास्त भाव, बाजारपेठ मिळण्यासाठी एम आय टी च्या माध्यमातून शेतकरी सक्षम करता येईल का या दृष्टीने सुद्धा एम आय टी ने काम करावे असे सांगितले. यावेळी राष्ट्रीय सरपंच संसद एम आय टी च्या स्वातीताई चव्हाण, अनिताताई जाधव, प्रतिभाताई शिर्के, स्वातीताई ढाणे, वैशालीताई भिलारे, पत्रकार मिलिंदाताई पवार यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. स्वागत स्वातीताई चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक एम आय टी सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. विक्रमसिंह जाधव यांनी केले. आभार एम आय टी सातारा जिल्हा महिला संघटक अनिताताई जाधव यांनी मानले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 26th Aug 2023 02:29 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 26th Aug 2023 02:29 pm













