घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याची कामगिरी बोरगाव पोलीसांनी केली
सतिश जाधव- Fri 31st May 2024 12:15 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : खोजेवाडी ता. सातारा येथे झालेल्या घरफोडीतील विजय गौतम बारहाते राहणार पिंपरी चिंचवड जिल्हा पुणे या चोरट्यास बोरगाव पोलिसांनी अटक करून गुन्ह्यातील चोरीस गेलेली रोख रक्कम आणि सोन्याची अंगठी व मोबाईल असा एकूण 96 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठांच्या सूचनेनुसार खोजेवाडी येथील घरपोडीचा गुन्हा उघडकीस आणल्याची कामगिरी बोरगाव पोलिस ठाण्याचे प्रकटीकरण शाखेने केली.
दिनांक 23 / 5 / 24 रोजी खोजेवाडी ता. सातारा येथे घरपोडी झाल्याचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. यामध्ये रोख रक्कम, सोन्याची अंगठी आणि मोबाईल असा एकूण 1 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार दादा स्वामी, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण यांना ही चोरी उघडकीस आणण्याची सूचना दिली. गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती घेऊन फिर्यादीच्या घरी यापूर्वी कामाला असलेल्या नोकरास ताब्यात घेऊन चोरीची चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेली 20,000 रुपये पैकी 2,500 रुपये रोख रक्कम तसेच सोन्याची अंगठी आणि मोबाईल असा 96 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आंचल दलाल अप्पर अधीक्षक, राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी, रवींद्र तेलतुंबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवलदार दादा स्वामी पोलीस, नाईक प्रशांत चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल विशाल जाधव यांनी कामगिरी बजावली या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विजय म्हेत्रे हे करीत आहेत.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 31st May 2024 12:15 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 31st May 2024 12:15 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 31st May 2024 12:15 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 31st May 2024 12:15 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 31st May 2024 12:15 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 31st May 2024 12:15 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Fri 31st May 2024 12:15 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 31st May 2024 12:15 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Fri 31st May 2024 12:15 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Fri 31st May 2024 12:15 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 31st May 2024 12:15 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Fri 31st May 2024 12:15 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Fri 31st May 2024 12:15 pm











