राहुल गांधींनी केला संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान, भाजपचे साताऱ्यात जोडे मारो आंदोलन
ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न : भाजपा आक्रमकSatara News Team
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
- बातमी शेयर करा

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, असा तिरपागडा आरोप करून संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला असल्याने भाजपाने त्यांच्याविरुद्ध कंबर कसली असून शुक्रवारी राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात आले, सातारा जिल्ह्यात सुद्धा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्या बरोबरच सातारा शहरात ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पोवई नाका येथे निषेध आंदोलन करण्यात आले, राहुल गांधींच्या फोटो ला जोडे मारून, फोटो जळण्यात आले
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झाला नसून गुजरात मधील तेली जातीत झालेला आहे, गुजरातमध्ये सन २००० मध्ये ओबीसीत आणली असून मोदी यांचा जन्म सामान्य जातीत झाला. त्यांनी कास्ट सेन्सेलला विरोध केला कारण त्यांचा जन्म ओबीसीत झालेला नसून सामान्य जातीत झालेला आहे असे बेताल व निर्ल्लज उदगार कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ओरिसातील सभेत काढले असून, राहुल यांचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समजाचा अपमान आहे असे मत ओबीसी जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे यांनी मांडले
राहुल गांधी हे कोणत्या कुटुंबात जन्माला आले, त्यांचे आडनाव कुणी आणि कशासाठी बदलले तसेच त्यांचा इटालियन कुटुंबाशी संबंध आहे. या लॉजिक प्रमाणे ते स्वत: भारतीय नागरिक ठरू शकत नाही. काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षण विरोधात राहली आहे. पंडीत नेहरू यांनी सन १९५३-५४ मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या शिफारशींचा विरोध केला होता. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी मंडल आयोगाला विरोध केलेला आहे. इंदिरा गांधीनी मंडल आयोग रद्दीत टाकला होता. राहुल गांधीच्या मते ओबीसी अंतर्गत अनेक जाती आरक्षणास पात्र नाहीत ; कारण त्या सर्व पूर्वी सामान्य वर्गात होत्या. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. एखाद्या जातीची ओबीसी विभागणी होण्यापूर्वी ज्या व्यक्तीचा अशा जातींमध्ये जन्म झाला त्यांचे आरक्षण राहुल गांधी काढून घेण्याच्या तयारीत आहे. कॉंग्रेस तेली समाजाला ओबीसी पासून वेगळे करण्याचा आणि ओबीसींचा एक वर्ग कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इतके वर्ष धर्म आणि जातीवरून फूट पडून ते आता ओबीसीमध्ये सुध्दा फूट पाडत आहेत आणि हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही असे परखड मत भा ज पा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी मांडले
अनेक राज्यात कॉंग्रेसने ओबीसीचे आरक्षण कमी करण्याचा प्रकार केलेला आहे. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा कॉंग्रेसने कधीही दिलेला नाही असे जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे यांनी सांगितले
युपीए -२ च्या सरकारमध्ये संपूर्ण कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून केवळ एकाच ओबीसी व्यक्तीला स्थान देण्यात आले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना आरक्षण देता आले नाही. धनगरांच्या आणि गोवारी जमातीचा अनुसूचित जमाती आरक्षणाबद्दल कॉंग्रेसनेच घोळ निर्माण करून ठेवला आहे असे महिला मोर्चा प्रदेश चिटणीस ऍड अरुणा पाटील बंडगर यांनी सांगितले
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस च्या नेत्यांना सातारा जिल्ह्यात फिरू देणार नसल्याचा इशारा ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष गौरी गुरव यांनी दिला
या वेळी ओबीसी मोर्च्या जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे, भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे,संतोष कणसे, मनीषाताई पांडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी,ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्ष गौरी गुरव, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस ऍड रूपाली पाटील बंडगर , सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण,कराड उत्तर मंडल अध्यक्ष शंकरकाका शेजवळ, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे आप्पा कोरे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत आंबेकर,युवराज मोरकर,किशोर पंडित, रवी लाहोटी, फत्तेसिंह पाटणकर, सुनील भोसले,अमोल कांबळे, सनी साबळे,सुनील लाड, इम्तियाज बागवान,सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे ,विक्रांत भोसले ,नितीन कदम, वैशाली टंग साळे, चित्रा माने ,हेमांगी जोशी ,प्रिया नाईक ,वनिता पवार, अश्विनी हुबळीकर ,हेमलता पोरे, सुरेखा धोत्रे,विकास बनकर, मनोहर कदम, सागर पवार ,संतोष कदम, अमोल माने, लिंबाजी सावंत ,विनोद देशपांडे, दिलीप शेवाळे ,आशिष सकुंडे, अमित भिसे, निवास अडसुळे ,रोहित किर्दत ,अक्षय भोसले, जयराज मोरे, सचिन साळुंखे रविकिरण पोळ, महेंद्र कदम ,यशराज माने, गौरव मोरे ,विजय पोरे ,प्रथमेश इनामदार, सुहास चक्के ,दिगंबर वास्के ,शैलेश संकपाळ,अंकुश लोहार,अमित काळे, पंकज खुडे, राहुल चौगुले, ओबीसी मोर्चा चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 9th Feb 2024 02:46 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 9th Feb 2024 02:46 pm