कराड नगरपरिषदेसाठी गुरुवारी ६ उमेदवारांचे ८ अर्ज दाखल
SUNIL PATIL
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
- बातमी शेयर करा
कराड : कराड नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज गुरूवार दिनांक १३ रोजी एकूण ६ उमेदवारांचे ८ अर्ज दाखल झाले. तर काल बुधवारी १ असे आजअखेर एकूण ७ उमेदवारांचे ९ अर्ज दाखल झाले आहेत.
सर्व उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जासोबत जोडावयाच्या आवश्यक कागदपत्रांसह आपले उमेदवारी अर्ज कराड नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सादर केले. तीन दिवसाच्या संथ प्रतिसादानंतर आज चौथ्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. त्यामध्ये प्रभाग ३ अ मधून एकाच उमेदवाराचे ३ अर्ज दाखल झाले. प्रभाग ३ ब मधून १, प्रभाग ७ अ मधून १, प्रभाग ८ ब मधून १ तर प्रभाग १४ अ मधून १ तर १४ ब मधून १ असे एकूण ८ उमेदवारी अर्ज आज दाखल झाले. यामध्ये प्रभाग ३ अ मधून सर्वसाधारण महिला गटातून रजनी अधिकराव पवार यांनी तीन अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग ३ ब मधून सर्वसाधारण गटातून साहेबराव रवींद्र शेवाळे यांनी, प्रभाग ७ अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून अंजली नथुराम कुंभार यांनी, प्रभाग ८ ब नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून संजय चंद्रकांत चन्ने यांनी, प्रभाग 14 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून वर्षा सचिन वास्के, प्रभाग 14 ब सर्वसाधारण गटातून शिवाजी पांडुरंग पवार आदींनी आपले उमेदवारी अर्ज आज दाखल केले.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास मुदत दिली आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोहिणी शिंदे व प्रशांत व्हटकर कामकाज पाहत आहेत.
#karad
#nagarpalika
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Thu 13th Nov 2025 08:33 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 13th Nov 2025 08:33 pm












