राज्यस्तरीय नाट्य प्रवेश स्पर्धेत श्री कोल्हेश्वर विद्यालयाचा द्वितीय क्रमांक
कोमल वाघ-पवार - Mon 30th Jan 2023 02:41 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पद्मश्री स्वर्गीय प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा-रहिमतपूर व कै. उमाताई शंकर कानेटकर सार्वजनिक ग्रंथालय रहिमतपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय गट नाट्य प्रवेश सादरीकरण स्पर्धेत श्री कोल्हेश्वर विद्यालय तांदुळवाडी मंगळापुर या विद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या शुभहस्ते झाले. परीक्षक म्हणून प्राध्यापक प्रफुल्ल कुमार कांबळे, सौ हेमांगी जोशी व श्री सोळसकर यांनी कामकाज पाहिले.
श्रुती श्रीकांत जाधव मृणाली मिलिंद क्षीरसागर, अमृता संतोष लोहार, रिद्धी चंद्रकांत शिंदे या विद्यार्थिनींनी अश्रूंची झाली फुले या वसंत कानिटकर लिखित नाटकातील नाट्य प्रवेश सादर केला होता. या विद्यार्थ्यांना डॉ सौ प्रियाताई शिंदे व आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ञ डॉ राजेंद्र शेंडे यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख चार हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री सत्यवान शिर्के,यास्मिन बागवान यांनी मार्गदर्शन केले होते.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आशा भोसले,उपाध्यक्ष शिवाजीराव माने, सचिव अरुण माने, कोषाध्यक्ष शिवाजी शिंदे, सहसचिव किरण भोसले, संस्थेचे सर्व संचालक,पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे


स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 30th Jan 2023 02:41 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 30th Jan 2023 02:41 pm













