सासपडे- गणेशखिंड येथे कोयत्याचा धाक दाखवून प्रवाशांना अडविण्याचा प्रयत्न
राजेंद्र डांगे
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
- बातमी शेयर करा
सासपडे :- सातारा तालुक्यातील परंतू कराड आणि पाटण या तिन्ही तालुक्याच्या हद्दीतील गावातील लोकांना तसेच तारळे ता.पाटण भागात जाणारे प्रवासी, रात्री उशिरा वेगवेगळ्या कंपन्या,साखर कारखाने या मधुन रात्रीच्या वेळी आपापल्या घरी जाणाऱ्या प्रवाशांना अडवून, कोयत्याचा धाक दाखवून मारहाण लुटालूट करण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मागील महिन्यात चंदन चोरांनी, तसेच भंगार चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातला होता. ही घटना ताजी असतानाच आत्ता रात्री ९.०० च्या सुमारास वाहने अडवून कोयत्याचा धाक दाखवून मारहाण व लुटालूट करण्याचा प्रकार घडला, यांची कल्पना बोरगाव पोलिसांना दिली असून पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परंतू कोयत्याचा धाक दाखवून वाहने अडविण्याचा नवीनच प्रकार घडू लागल्याने बोरगाव पोलिसांना चोरट्यांनी एक प्रकारे आव्हानच दिले असल्याचे दिसून येत आहे. गावामध्ये रात्र गस्त चालू असून चोरट्यांच्या शोध घेण्यासाठी सासपडे -गणेशवाडी येथील युवकांनी संयुक्त मोहीम आखली आहे.त्यासाठी उद्या पहाटे पासून सुरुवात करणार आहेत. बोरगाव पोलिस ठाण्यात कर्मचारी संख्या कमी असून आणखी कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेणार असल्याचे युवकांनी सांगितले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Thu 15th Feb 2024 11:14 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Thu 15th Feb 2024 11:14 pm











