भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यचळवळीतील व राष्ट्र उभारणीतील योगदान महत्त्वाचे - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
Satara News Team
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
- बातमी शेयर करा
सातारा : भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्या चळवळ व राष्ट्र उभारणीतील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्य व जिल्हास्तरावर ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. शासनाने घेतलेला हा निर्णय केवळ प्रतीकात्मक नसून भटके विमुक्त समाजाच्या सामाजिक न्याय, आत्मसन्मान आणि प्रतिष्ठेसाठी एक निर्णायक टप्पा आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
गोंदवले बुद्रुक तालुका माण येथील श्री. संत गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भटके विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमातून या समुदायाचा संघर्ष, योगदान आणि सामाजिक हक्क समाजातील अन्य घटकांपर्यंत पोहोचेल.
शाळेमध्ये भटक्या व विमुक्त समाजाच्या संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा यांचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक, शैक्षणिक व माहितीपर उपक्रम राबविण्यात आले आहेत त्याची पाहणी श्री. गोरे यांनी करून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मुक्त संवाद साधला. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने शाळेत राबविलेल्या उपक्रमांबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह उर्जादायी होता.
या कार्यक्रमास प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कांचन जगताप, गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे, संत गाडगे महाराज आश्रम शाळेचे संचालक सूर्यकांत माने, संचालक शिवाजी महानवर, गोंदवलेचे सरपंच विष्णुपंत कट्टे पाटील, राहुल भोसले यांच्यासह आदी मान्यवर, शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 31st Aug 2025 05:09 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 31st Aug 2025 05:09 pm












