शिव छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्याच्या मातीतील महान कर्तृत्ववान महापुरुषांची अप्रत्यक्ष विटंबना थांबवा: किशोर शिंदेची मागणी
Satara News Team
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारकर जनतेला आवाहन आहे कि जगाच्या इतिहासात नोंद आहे अशी ऐतिहासिक कामगिरी केलेले महान योद्धे सातारच्या मातीने दिलेत. छत्रपती शिवराय, कण्हेरखेडचे श्रीमंत महादजी शिंदे, शंभूराजे यांच्या मातोश्री सईबाई फलटणच्या, धावडशीच्या महाराणी लक्ष्मीबाई (झाशीच्या रणरागिणी ), तळबीडचे हंबीरराव मोहिते, भोसरे येथील प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, गोडोली अशी अनेक नावे समोर येतात.
ह्या सर्व महापुरुषांच्या कामगिरीमुळे आज आपण आहोत, यांच्या कार्याची परतफेड आपल्याकडून कधीही होऊ शकणार नाही, अशा महापुरुषांच्या आदर, सन्मानाची काळजी घेणे ही आपली जबाबदारीअसताना, अलीकडच्या काळात सुमार, बाजारू, सुमार दर्जाच्या, भ्रष्टाचार करणाऱ्या भाडोत्री लोकप्रतिनिधी यांच्या चाहत्यांनी स्वतःचा राजकीय रोजीरोटीचा धंदा चालण्यासाठी गावागावात अशा लोकांना महापुरुषांच्या यादीत स्थान दिलं आहे, महापुरुषांच्या फोटोशेजारी राजकारणी दिसू लागलेत. ही अक्षरशः त्या महापुरुषांची अप्रत्यक्ष विटंबना आहे ही जी ताबडतोब थांबली पाहिजे.
आमच्या कण्हेरखेड गावाला श्रीमंत महाराजा महादजी शिंदे यांच्या पुण्य कर्तृवामुळे जो सन्मान आम्हाला मिळतो त्याची परतफेड आम्ही कधीही करू शकणार नाही. परंतु काही कर्मदरिद्री घटकांनी गावासाठी कसलंही योगदान नसताना, आपल्या बापजाद्यांच्या दैदिप्यामान इतिहासाची वाट लावण्याचा घाट घातला आहे. त्यांनी स्वतःचं घर चालवण्यासाठी कोणत्याही सुमार नेतृत्वाना महादजी बाबा यांच्या श्रेणीत बसवण्याचा नालयाकपणा केलेला दिसतोय.
बोपगांव गावचे मयत श्री लक्ष्मण पाटील यांचं आमच्या गावासाठी काहीही योगदान नाही, त्यांच्या प्रेरणेची आम्हाला कसलीच आवश्यकता नाही हे आम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांना कळवले आहे, त्यांनी तो फोटो सन्मानपूर्वक स्वतःच्या ताब्यात घ्यावा असं कळवलं आहे. गंभीर बाब म्हणजे स्वतः बोपेगावच्या सोसायटी चेअरमन यांनी श्रीमंत महादजी शिंदे बाबा यांच्या सन्मानात कोणताही फोटो लावण्याची आवश्यकता नाही असे कळवले आहे. आम्ही सर्व कण्हेरखेडंचे शिंदे वं 12 बलुतेदार समाज बोपेगावच्या त्या प्रवृत्तीचा निषेध करतो.
*कण्हेरखेड वं त्याप्रमाणे ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सर्व गावातील स्वाभिमानी गावकर्यांना विनंती राहील कि तुमचे आहो्भाग्य कि तुम्हाला महापुरुषांच्या गावात, कुळात जन्म मिळाला, त्याची आब रखा, वं भाडोत्री, भ्रष्टाचारी सुमार राजकीय पक्षाच्या स्वयं घोषित लोकांना महापुरुषांच्या रांगेतून दूर करा अशी मागणी किशोर शिंदे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे...
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 5th Aug 2023 12:16 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 5th Aug 2023 12:16 pm













