राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या सहा जण ताब्यात. तब्बल ३६ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त

सातारा : राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेत तब्बल ३६ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. 
वाई येथील बावधन नाका व सुरूर ता. वाई तसेच सातारा येथील चारभिंती परिसरातुन बनावट गुटख्यासह महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला गुटखा (विमल पान मसाला, सुगंधी तंबाखू व आर.एम.डी) वगैरे असा माल जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रतिबंधीत गुटख्याच्या बाबतीत विशेष मोहिम राबवुन एकाच दिवसात तीन ठिकाणी गुटख्याची कारवाई करुन १२ लाख ३९ हजार १२ रुपयेचा प्रतिबंधीत गुटखा, २ इनोव्हा कार, १ ऑटोरिक्षा व बनावट गुटखा तयार करण्याचे “ब्लेंडीग अॅण्ड पॅकिंग मशीन" असा एकुण ३६ लाख ३९ हजार १२ रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला आहे. सदर बाबत अनुक्रमे वाई पोलीस ठाणे, भुईंज पोलीस ठाणे तसेच सातारा शहर पोलीस ठाणे येथे संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे यांनी महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतुक करणान्या व बाळगणान्या इसमांची माहिती काडुन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाया केल्या आहेत

सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री अजित बो-हाडे, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या सूचनाप्रमाणे व श्री अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या अधिपत्याखाली सपोनि रमेश गर्जे, पोउनि मदन फाळके, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, विजय कांबळे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, संतोष पवार, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, रोहित निकम, धीरज महाडीक, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत, सचिन ससाने, चापोहवा शिवाजी गुरव तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाकडील निरीक्षक इम्रान हवालदार, रोहन शहा व श्रीमती वंदना रुपनवर यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला