सातारा रस्त्यावर एकाच दिवशी 5 वाहनांची धडक
Satara News Team
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
- बातमी शेयर करा
सातारा : पुणे – सातारा रस्त्यावर शनिवारी सकाळच्या सुमारास विचित्र अपघाताची घटना घडली. एका मागून पाठोपाठ पाच वाहनांचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र अपघातानंतर सुमारे तीन तासानंतर याठिकाणी झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सातारा रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक टेम्पो दुभाजक तोडून खांबाला धडकला होता. या अपघातामुळे दुभाजकाचा पत्रा तूटून रस्त्यावर पडला होता. रस्त्यावर मोठा पत्रा आडवा पडल्याने सदर ठिकाणी एक एसटी बस, एक पिकअप, एक मोटारगाडी ही तीन वाहने थांबली होती. तितक्यात पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने या तीन वाहनांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात चारचाकी कार उड्डाणपुलावरुन खाली कोसळली.
तर एसटी बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे पुलावरून कोसळली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या अपघातात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. या ठिकाणी अपघातानंतर सुमारे तीन तास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची क्रेन अपघात स्थळी आली नाही. त्यामुळे खासगी क्रेन लावून या अपघातातील वाहने बाजूला घेण्यात आली. मात्र, या झालेल्या उशीरामुळे याठिकाणी सुमारे तीन तास वाहतूक कोंडी झाली. त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 27th Jan 2024 02:34 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 27th Jan 2024 02:34 pm













