फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.

फलटण शहराच्या विकासासाठी रणजीत सिंहांची सकारात्मक दूरदृष्टी

फलटण, दि. १५ जुलै : फलटण शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि शहरा तील सर्व अंतर्गत रस्ते खड्डेमुक्त व टिकाऊ आणि उच्च दर्जाचे करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्लीत मोठी बाजी मारली आहे. फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल ७० कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे फलटण शहरातील सर्व प्रमुख रस्ते आता उच्च दर्जाचे आणि सिमेंट काँक्रीटचे होणार आहेत.


*नवी दिल्लीत सदिच्छा भेट आणि तातडीची मंजुरी*


आज नवी दिल्ली येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत रणजितदादांनी फलटण शहरातील बऱ्याच वर्षापासून दुर्लक्षित असणारा अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा गडकरी साहेबांसमोर मांडत भरीव निधीची आग्रही मागणी केली.


*"रणजीत सिंह निंबाळकरजींनी निधी मागितल्यावर आम्हास नाही म्हणता येत नाही!"*


रणजितदादांच्या या मागणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने ७० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. विशेष म्हणजे, ही मंजुरी देताना गडकरी साहेबांनी रणजितदादांच्या कार्याचा गौरव करत म्हटले की, "निंबाळकरजींनी निधी मागितल्यावर त्यांना नाही म्हणता येत नाही. त्यामुळे सदरील रस्ते तातडीने मंजूर करावेत व येणाऱ्या सहा महिन्यांत कामाला सुरुवात सुद्धा करावी," असे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.


*फलटणमध्ये गडकरींच्या माध्यमातून रस्त्यांचे 'शतक' पार*


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीही रणजितदादांच्या शब्दाला मान देऊन फलटण शहरासाठी निधीची अक्षरशः तिजोरी उघडली आहे.

* शहरातून जाणाऱ्या अंतर्गत पालखी महामार्गासाठी यापूर्वीच सुमारे ७५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

* नुकतेच शहरातील 'मिसिंग मार्गासाठी' ९७ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

* आणि आज त्यात या ७० कोटींच्या निधीची भर पडली आहे. या भरघोस निधीमुळे फलटण शहरातील सर्वच्या सर्व प्रमुख रस्ते हे आता उच्च दर्जाचे आणि सिमेंट काँक्रीटचे होणार असल्याने शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.


नगरपरिषदेपासून ते केंद्रापर्यंत सरकारचा फायदा

या ऐतिहासिक निधी मंजुरीबाबत बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत.


ते म्हणाले की, "फलटण शहराचा व तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. आज फलटणमध्ये नगरपरिषदेपासून ते राज्यापर्यंत आणि थेट केंद्रापर्यंत भाजपचे सरकार असल्याने आपल्याला निधीची कोणतीही कमतरता भासत नाही. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला असाच भरघोस निधी मिळत आहे आणि यापुढे सुद्धा मिळत राहील." असा ठाम विश्वास रणजितदादांनी यावेळी व्यक्त केला.

एकंदरीतच रंजीत दादांचा तालुक्यासाठी असणारा आणि फलटण शहर एक आदर्श शहर म्हणून विकासाच्या भूमिकेतून नावारूपाला आणण्याचा सर्व मूलभूत आणि पायाभूत सोयी सुविधांची कुठेही उनीपासून देण्याचा सकारात्मक दृष्टिकोन पाहता फलटण शहराचा पुढील भविष्यकाळा चेहरा मोहरा बदलणार असे भविष्यातील चित्र दिसून येत आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला