वडिलांची साद, त्याला नीलमचा प्रतिसाद

अपघातग्रस्त लेकीसाठी वडील पोहोचले अमेरिकेत

कराड : अमेरिकेत अपघातात गंभीर जखमी झालेल्या नीलम शिंदे हिने अपघातानंतर अठरा दिवस कोमात असणाऱ्या नीलम शिंदे हिने सोमवारी वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला. अतिदक्षता विभागात अत्यवस्थ असलेल्या लेकीला हाक मारल्यानंतर डोळ्यांची किंचित हालचाल झाल्याने वडिलांच्या येण्याने नीलम उपचारांना प्रतिसाद देईल, असा विश्वास तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

 शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असणारी अपघातग्रस्त नीलम शिंदे अत्यवस्थ अवस्थेत अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. तिच्या रक्तातील नातेवाइकांना व्हिसा मिळविण्यात येणाऱ्या अडचणींचे विघ्न सुटून तिचे वडील तानाजी शिंदे आणि मामाचा मुलगा गाैरव कदम चोवीस तासांच्या प्रवासानंतर यूसी डेव्हिस मेडिकल सेंटर सॅकरामेन्टो येथे पोहोचले. रात्री उशिरा पोहोचल्यामुळे नीलमवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय टीमबरोबर वडिलांचा संवाद झाला नाही. मात्र, तिची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वडिलांची हाक ऐकल्यावर डोळे बंद असतानाही तिच्या बुबुळांची हालचाल टिपली.

 कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज गावातील नीलमचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत अपघात झाला. व्यायामासाठी चालत असताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून तिला जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कारचालकाला पोलिसांनी पकडले आहे. या अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हातापायांना दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. तिचे वडील व मामाचा मुलगा सॅकरामेन्टोला निघाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री ते पोहोचले. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री साडेअकरानंतर नीलमवर उपचार करणारे डाॅक्टर तिच्या कुटुंबीयांशी बोलून उपचारांची पुढील दिशा ठरविणार आहेत.

भारतीयांची मदत अन् डाॅक्टरांची प्रतीक्षा...... उंब्रज येथील नीलम शिंदे हिला भेटण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना मदत करण्यासाठी अमेरिकेच्या सॅकरामेन्टो येथील भारतीयांनी आघाडी घेतली. विमानतळावरून हाॅस्पिटलमध्ये नेण्यासाठी भारतीय पोहोचले होते. दहा दिवस त्यांच्या राहण्याची व्यवस्था सॅन जोसे स्टेट युनिव्हर्सिटीने केली आहे. तिने या दोघांना काेणतीही अडचण येणार नाही याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला