वाठार स्टेशन येथील श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांचा रथोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
Satara News Team
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
- बातमी शेयर करा

वाठार स्टेशन : महाराष्ट्रातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान समजले जाणारे वाठार स्टेशन येथील श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या ८८ व्या पुण्यतिथी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रथोत्सवाचे मोठ्या स्वरूपात आयोजन करण्यात आले होते.
२४ जानेवारी रोजी श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांचा रथोत्सव सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून भाविक भक्तगण मोठ्या उत्साहामध्ये सामील झाल्याचे चित्र दिसून आले. सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण तसेच जागोजागी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. जिल्ह्यातील नऊ प्रकारचे बँड तसेच घोडे, डॉल्बी सिस्टीम, जागोजागी भंडारा व फुले उधळण्यासाठी फ्लॉवर गन हे सर्व या सोहळ्यामध्ये विशेष आकर्षण ठरत होते.
सकाळी १० वाजता सज्जनगड देवस्थानचे सोन्ना बुवा रामदासी, जंगली महाराज आश्रम अंबवडे मठाचे मठाधिपती परमपूज्य ब्रह्मानंद बाबा यांच्या शुभहस्ते रथाचे पूजन करून श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांची मिरवणूक संपूर्ण वाठार नगरीत सवाद्य काढण्यात आली. श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज की जय या जयघोषात संपूर्ण वाठार नगरी दुमदुमून गेली. संपूर्ण गावात चौका चौकात जागोजागी श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज रथयात्रेचे शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. जागोजागी स्वागत कमानी उभ्या करण्यात आल्या होत्या. गावातील तसेच पंचक्रोशीमधील भाविक भक्तगण मोठ्या प्रमाणात अन्नदान तसेच पाणी वाटप, सुगंधी दूध वाटप करताना दिसून येत होते.
संपूर्ण मंदिर व मंदिर परिसरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मा. निवृत्ती भाऊ करे यांनी सांगितले की, दरवर्षी रथोत्सव सोहळा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्याचप्रमाणे वर्षभर पौर्णिमेनिमित्ताने विविध कार्यक्रम तसेच कीर्तनाचे आयोजन केले जाते. वर्षभर येथे अन्नदान होत असते. भावीक भक्तगणांना समर्थांची प्रचिती आल्याने सढळ हाताने ते वेळोवेळी मदत करताना दिसून येतात. संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा रथउत्सव सोहळा पाहण्यासाठी व देवांचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्तगण रांगाच रांगा लावताना दिसून येत आहेत. यावर्षी सात दिवस चाललेल्या या पारायण सोहळ्याला महाराष्ट्रातून नामवंत व सुप्रसिद्ध कीर्तनकारांची मांदीयाळी पहावयास मिळाली. त्याचप्रमाणे अन्नदात्यानी अन्नदान ही मोठ्या सढळ हाताने केले. येत्या काळात देवस्थानचा मोठ्या प्रमाणात कायापालट होणार असून विविध विकास कामांच्या माध्यमातून हे सर्व शक्य होणार आहे असे निवृत्तीभाऊ करे यांनी सांगितले.
स्थानिक बातम्या
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 29th Jan 2024 01:00 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 29th Jan 2024 01:00 pm