मुलानेच मारला बापाच्या दागिने,पैशावर डल्ला
जावलीतील घरफोडीच्या गुन्ह्याची बारा तासात उकलSatara News Team
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
- बातमी शेयर करा
जावली : जावली तालुक्यातील कुडाळ येथील सेवानिवृत्त कर्मचारी कृष्णा सखाराम शेवते यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोख पैशासह तीन लाख तीस हजारांचा डल्ला मारला होता.घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि पृथ्वीराज ताटे आणि त्यांच्या टीमने कसून तपास करत या घरफोडीचा छडा फक्त बारा तासात लावला असून शेवते यांच्या मुलगा निलेश यानेच ही घरफोडी केल्याची उकल करून दिवट्या मुलाला अटक केली आहे त्याला न्यायालयाने ९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सपोनि ताटे यांनी मेढा पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झाल्यानंतर आपल्या कारभाराची चुणूक दाखवून दिली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळ येथील कृष्णा शेवते यांच्या राहते बंद घराचे दरवाज्याचे कुलूप काढून कोणीतरी अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घराचे भिंतीतील लाकडी कपाताचा कडी कोयंडा काढून कपाटातील पाच तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ व रोख रक्कम असे एकूण ८०,००० रू रोख रक्कम असा ३,३०,००० रू. किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरुन नेला होता.याबाबतची तक्रार शेवते यांनी पोलिसात दाखल केली होती.गुन्ह्याच्या अनुशंगाने सखोल तपास करत असताना ही घरफोडी शेवते यांचा घरातून विभक्त राहणारा मुलगा निलेश कृष्णात शेवते याने केला असल्याबाबत संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आलेला आहे..
आरोपी निलेश याच्याकडून या गुन्ह्यातील चोरीस गेलेली पाच तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ तसेच रोख रक्कम ५५,५०० रू.असा एकुन ३,३०,००० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने ९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सपोनि पृथ्वीराज साठे यांनी मेढा पोलीस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यानंतर घरपोडी सारख्या होण्याची बारा तासात उकल केल्याबद्दल सपोनि ताटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली केली या कारवाईत सपोनि पृथ्वीराज ताटे,सहा.पोलीस फौजदार विकास गंगावणे,विजय शिंगटे,पो .हवा.डी.जी.शिंदे,पी.डी.माने,पो.कॅा.आर. टी.शेख,सनी काळे,अभिजित वाघमळे यांनी सहभाग घेतला.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 8th Aug 2024 04:48 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Thu 8th Aug 2024 04:48 pm











