सातारा न्यूजचा इम्पॅक्ट; हिडन कॅफे मालकासह दोन युवकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

शहर पोलिसांची कारवाई : कॅफेतील रूम मध्ये सूरू होते अश्लील चाळे; इतर हिडन कॅफेवर कारवाई कधी ?

सातारा : एमआयडीसीतील प्रिती हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या हिडन कॅफेत काही दिवसापासून छोटय़ा रूम बनवून अश्लील चाळे सुरू होते. यांची पोलखोल सातारा न्युज आणी रिपाइं पक्षाच्या आठवले गटाने शुक्रवारी आक्रमक भूमिका घेतली. तोच पोलिसांनी जाग येताच घटनास्थळी पोहचून पंचनामा करत कॅफे मालकासह तीन युवकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश केदारी कागिलकर(वय 21, रा. नागेवाडी ता. सातारा), शुभम विष्णु शिंदे(वय 24, रा. किन्हई ता. कोरेगाव), विक्रम नंदकिशोर निकम(वय 22, शिवाजी चौक पुसेगाव), आशुतोष हिंदूराव माने(रा. धनगरवाडी ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

 
      शहरात कॅफेच्या नावाखाली सूरू असलेले अश्लील चाळे पोलिसांच्या नजरेस पडत नाहीत. यामुळे यांचा फायदा घेत शहरातील काही कॅफेत छोटय़ा रूम बनवून प्रेमी युगुलांची मौज मजा सुरू आहे. यात अल्पवयीन मुली, युवक-युवतींचा वाढता सहभाग चिंतेचा विषय बनला आहे. अशा कॅफेंना परवानगी देऊन अत्याचाराला खत पाणी घालण्याचे काम प्रशासन करत आहे. यामुळे प्रशासनाची दुटप्पी भूमिका अनेकांना वाव देत आहे. या बाबतीत सातारा न्युजने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.या बरोबरच रिपाइं पक्षाच्या आठवले गटाच्या कार्यक्रर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पोलीसांना जाग आली. आणि पोलीस घटनास्थळी पोहचून कारवाई करू लागले. इतक्या दिवस कॅफेच्या नावाखाली सुरू असलेले हे प्रकार पोलिसांच्या नजरेस का पडले नाहीत.  
आणि अशा कॅफेना परवानगी देण्यामागचे कारण काय असा ही प्रश्न उपस्थित होत आहे. कॅफेत अत्याचार केल्याचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तरीही कॅफे मालकांवर ठोस कारवाई होत नाही. उलट पडद्यामागे सुरू असलेले प्रकार पडदा न उघडता सुरू ठेवण्यास परवानगी दिली जाते. यामुळे वाढत्या अत्याचाराचे प्रमाण हे कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.  

 

पुजा बनसोडेवर मालमत्ता नुकसानीचा गुन्हा दाखल
रिपाइं पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पुजा बनसोडे यांनी आक्रमक भूमिका घेत कॅफेत सुरू असलेला प्रकार उघडकीस आणला. यावेळी कॅफेच्या एका बाजूचे बंद शर्टर उघडण्यास सांगूनही मालकाने नकार दिला. यामुळे दगड घेऊन काच फोडून कॅफेतील वास्तव समोर आणले. यामुळे त्यांच्यावर कॅफे मालक विक्रम निकम याच्या तक्रारीवरून पोलिसांनी मालमत्ता नुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

चौफेर हिडन कॅफे तरी...
सातारा शहरातील मध्यवर्ती असे अनेक हिडन कॅफे आहेत. कमी पैशात मैजमजा करण्यास मिळत असल्याने दिवसभर हे कॅफे गर्दीने फुलून जातात. कॅफेच्या काळ्या काचेतून काही कळून येत नसल्याने मालकांना पोलिसांच्या कारवाईची भीतीही वाटत नाही. कारण पोलिसांना असे प्रकार लवकर निदर्शनास येत नाही. त्यांच्याकडून जुगार, मटका, व सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात येतो. जेव्हा विरोध होईल तेव्हाचे पोलीस कारवाईचा पवित्रा घेणार आहे. यामुळे एका हिडन कॅफेवर कारवाई झाली पण इतर हिडन कॅफेवर कारवाई होणार का यांचे उत्तर गुलदस्त्यात आहे.  

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला